Train Ticket Rules: भारतीय रेल्वेतून दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. प्रवाशांसाठी रेल्वेकडून अनेक नियम बनवले गेले आहेत. प्रवाशांची ट्रेन सुटली तर संपूर्ण प्रवासच खुंटतो. अशावेळी पहिल्यांदा मनात प्रश्न येतो तो म्हणजे तिकिट रिफंड होणार का? व दुसरा प्रश्न म्हणजे याच तिकिटावर दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करु शकतं का? याबाबत रेल्वेचे नियम काय सांगतात जाणून घ्या.
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, जर एखाद्या प्रवासाकडे जनरल कोचचे तिकिट असेल तर तो व्यक्ती दुसऱ्या ट्रेनने प्रवास करु शकतो. या परिस्थितीत ट्रेनची कॅटगरी जसं की, वंदे भारत, सुपरफास्ट, राजधानी एक्स्प्रेस यासारख्या ट्रेनचादेखील विचार केला जातो. जर एखाद्या प्रवाशाकडे रिझर्व्ह तिकिट असेल तर अशा परिस्थितीत दुसऱ्या ट्रेनने प्रवास केला जाऊ शकत नाही. अशावेळी तुम्ही चुकूनही त्या तिकिटावर दुसऱ्या ट्रेनमध्ये प्रवास करु नका. अन्यथा, पकडल्या गेल्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागेल.
तुमची ट्रेन सुटली असेल तर तुम्ही रिफंडसाठी अप्लाय करु शकता. यासाठी IRCTCच्या अॅपवर लॉगइन करुन टीडीआर फाइल करु शकता. तुम्हाला ट्रेनच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर फाईल टीडीआर ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला फाईल टीडीआरचा पर्याय दिसेल. क्लिक केल्यानंतर तुमचं तिकिट दिसेल. त्यावर टीडीआर फाइल करु शकता. तुमचं तिकिट निवडा आणि फाईल टीडीआरवर क्लिक करा. टीडीआर निवडल्यानंतर टीडीआर फाईल होईल. त्यानंतर 60 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचा रिफंड मिळणार आहे.
रेल्वेच्या नियमांनुसार, कन्फर्म ट्रेन तिकिटाच्या बाबतीत, जर तिकीट 48 तासांच्या आत किंवा नियोजित सुटण्याच्या वेळेच्या 12 तास आधी रद्द केले गेले, तर एकूण रकमेपैकी 25% कपात केली जाईल. ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या 4 तास ते 12 तास आधी तिकीट रद्द केल्यास तिकीटाच्या रकमेपैकी अर्धी रक्कम म्हणजेच 50% रक्कम परत मिळेल. वेटिंगलिस्ट आणि आरएसी तिकिटे ट्रेनच्या नियोजित सुटण्याच्या वेळेच्या 30 मिनिटे आधी रद्द करणे आवश्यक आहे, अन्यथा कोणताही परतावा दिला जाणार नाही.