नवं घर खरेदी करायचं की, भाड्याच्या घरात राहायचं? कसे वाचतील लाखो रुपये? पाहा सोपं गणित

Buying New Home : एक असा पर्याय ज्यामध्ये इतके पैसे वाचतील की एकाच वेळी घेऊ शकाल दोन घरं... थट्टा नाही... गणित समजून घ्या.   

सायली पाटील | Updated: Sep 26, 2024, 01:27 PM IST
नवं घर खरेदी करायचं की, भाड्याच्या घरात राहायचं? कसे वाचतील लाखो रुपये? पाहा सोपं गणित  title=
buying new home or renting a home which is beneficial option know the calculations

Buying New Home : हक्काचं आणि स्वत:चं घर असावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. अनेकदा घराशी भावनिक नातंही जोडलं डातं. पण, घर घेण्यासाठीचा प्रवास आणि हे स्वप्न साकार होण्यापर्यंतचा टप्पा ही सोपी बाब नाही. घर खरेदी करण्यासाठीचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, त्यासाठीकं कर्ज. हल्ली नोकरी त्यातही समाधानकारक पगाराची नोकरी मिळाल्यास अनेक मंडळी घरासाठीची धडपड सुरू करतात. पण, घरासाठी गृहकर्ज घेणं खरंच योग्य आहे का? 

समजून घ्या घर खरेदीचं गणित 

मागील काही वर्षांमध्ये देशात अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांच्या वतीनं 2BHK फ्लॅट खरेदी करण्याला प्राधान्य मिळताना दिसत आहे. प्रत्येक शहरानुसार या फ्लॅटचे दर निश्चित होत असून, आता उदाहरण म्हणून एखादा फ्लॅट 50 लाखात मिळत असेल, तर त्यासाठी 15 टक्के रक्कम डाऊन पेमेंट स्वरुपात द्यावी लागते. म्हणजेच 7 ते 8 लाख रुपये डाऊन पेमेंट स्वरुपात द्यावे लागतात. सोबतच स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्ज आणि ब्रोकरेज अशाही अनेक गोष्टींसाठी पैसे आकारले जातात. 

नवी घर खरेदी केल्यानंतर त्यामध्ये सजावट किंवा इतर दुरूस्ती कामांसाठी साधारण चार ते पाच लाखांचा खर्च केला जातो. थोडक्यात घरात प्रवेश करण्याआधीच खर्च केलेली रक्कम 12 ते 15 लाखांच्या घरात पोहोचते. उदाहरणासह समजायचं झाल्यास 50 लाखांच्या घर खरेदीसाठी 7 लाखांचं डाऊन पेमेंट गरजेचं असतं. क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास यासाठी 9 टक्क्यांचं व्याज आकारलं जातं. 

9 टक्के व्याजाच्या हिशोबानं 20 वर्षांसाठी 43 लाखांच्या हिशोबानं 38688 इतका EMI जाणं अपेक्षित असतं. शिवाय यामध्ये घराच्या सजावटीसाठीचा खर्चही आलाच. त्यामुळं आता पर्यायी मार्गाचा विचारही करा. 

हेसुद्धा वाचा : फक्त खळखळून हसण्यासाठी अभिनेत्रीला मिळतात कोट्यवधी रुपये

जे घर खरेदी करण्याचा विचार तुम्ही करताय तेच भाड्यावर घेतल्यास त्यासाठी साधारण 15 ते 17 हजारांचं भाडं खर्च होतं. म्हणजेच महिन्याला साधारण 21 हजार रुपयांची बचत. आता हीच रक्कम योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास तुम्हाला कोट्यवधींची बचत करणं सहज शक्य होईल. त्यामुळं हा परतावाच तुमच्यासाठी लॉटरीहून कमी नसेल. 

भाड्यानं राहत तुम्ही ईएमआयसाठीच्या रकमेची गुंतवणूक करून कोट्यवधी रुपये जमवू शकता. 20 वर्षांत तुमच्याकडे साधारण 3 ते 5 कोटी रुपये इतकी रक्कम जमा असू शकते. त्यामुळं या रकमेत तुम्ही अगदी सहजपणे एक किंवा दोन घरंही खरेदी करू शकता. रिअल इस्टेटमध्येच गुंतवणूक करायची झाल्यास टीयर 2 किंवा टीयर 3 शहरांमध्ये भूखंड खरेदी करणं एक उत्तम पर्याय ठरेल.