धनतेरस-दिवाळीला फक्त 1 रुपयात मिळेल शुद्ध सोनं; जाणून घ्या खरेदीची प्रक्रिया

 धनतेरस - दिवाळीला तुम्ही फक्त 1 रुपयात सोनं खरेदी खरेदी करू शकता. हे सोनं एकदम शुद्ध आणि सुरक्षित असणार आहे

Updated: Oct 22, 2021, 02:40 PM IST
धनतेरस-दिवाळीला फक्त 1 रुपयात मिळेल शुद्ध सोनं; जाणून घ्या खरेदीची प्रक्रिया title=

मुंबई : धनतेरस - दिवाळीला तुम्ही फक्त 1 रुपयात सोनं खरेदी खरेदी करू शकता. हे सोनं एकदम शुद्ध आणि सुरक्षित असणार आहे. 1 रुपयांत सोनं खरेदी करण्याची प्रक्रिया आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

धनतेरस किंवा दिवाळीला सोने खरेदी शुभ मानली जाते. या फेस्टिवल सिजनमध्ये सोने-चांदीची भरपूर खरेदी केली जाते. जर तुम्हीदेखील खरेदीचे नियोजन करीत असाल तर, तुमच्यासाठी फक्त 1 रुपयात सोने खरेदीची संधी आहे. 

सणासुदीच्या दिवसांमध्ये 1 रुपयात सोनं खरेदी करू इच्छित असाल तर डिजिटल गोल्ड तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. जर तुमच्याकडे GooglePay, Paytm, PhonePay ही ऍप आहेत किंवा तुम्ही HDFC बँक सेक्युरिटिज, मोतिलाल ओस्वालचे ग्राहक असाल तर, डिजिटल पद्धतीने फक्त 1 रुपयात 999.9 शुद्ध सर्टिफिकाइड सोनं खरेदी करू शकता. मागील काही वर्षात डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

खरेदी करण्याची प्रक्रिया
GooglePay या पेमेंट ऍपवर खरेदी करण्यासाठी लॉग इन करा. स्क्रोल करून Gold आयकॉनवर क्लिक करा

मॅनेज मनीमध्ये Buy Gold च्या पर्यायवर क्लिक करा. येथे तुम्ही डिजिटल गोल्ड खरेदी करू शकता. 5 रुपयांमध्ये 0.9 mg सोने मिळू शकते. 

जर तुम्हाला सोनं विकायचे असेल तर, Sale बटनवर क्लिक करा. तसेच गिफ्टचे ऑप्शन निवडावे लागेल. 

ग्राहकांना सोन्याची डिलिवरीचा पर्याय देखील निवडता येतो. फिजिकल गोल्डचे शिक्के किंवा बारच्या स्वरूपात घरी डिलिवरी मिळू शकते.