Jai Anmol Ambani : आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे लहान भाऊ अनिल अंबानी (Anil Ambani) यांचा व्यावसायिक प्रकार बराच चढ-उताराचा राहिलाय. 2006 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Reliance Industry LTD) विलीनीकरणानंतर अनिल अंबानी यांना मोठा धक्का बसला होता. तर 2020 मध्ये अनिल अंबानी यांना डिफॉल्टर घोषित करण्यात आलं होतं. पण त्यांचा मोठा मुलगा जय अनमोल अंबानी (Jai Anmol Ambani) हा अनिल अंबानींच्या नशिबाचा तारा म्हणून उदयास आला आहे.
रिलायन्स कॅपिटल लिमिटेडमध्ये अनिल अंबानी यांची दोन्ही मुलं जय अनमोल अंबानी आणि जय अंशुल अंबाना यांच्या सहभागानंतर रिलायन्स समुहाच्या अनेक कंपनीच्या शेअर्समध्ये वेगाने वाढ झाली आहे.
रिलायन्स समुहात ट्रेनी म्हणून सुरुवात
जय अनमोल अंबानी यांचं शालेय शिक्षण मुंबईतल्या कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये झालं. त्यांतर इंग्लंडच्या सेवेनओक्स शाळेत त्यांनी पुढचं शिक्षण पूर्ण केलं. वारविक बिझनेस स्कूलमध्ये त्यांनी विज्ञान शाखेत पदवी घेतली. शिक्षण पू्र्ण झाल्यानंतर जय अनमोल अंबानी भारतात परतले आणि रिलायन्स कॅपिटलमध्ये ट्रेनी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
ट्रेनीपदाच्या कार्यकाळात जय अनमोलने कंपनीतील विविध क्षेत्राविषयी सखोल माहिती घेतली. 2016 मध्ये जय अनमोलने कंपनीत अतिरिक्त संचालक म्हणून सूत्र हाती घेतली. यानंतर एकाच वर्षात कार्यकारी निदेशकपदाची जबाबदारी सांभाळली.
2018 मध्ये अनमोल अंबानी रिलायन्स निप्पॉन लाइफ असेट मॅनेजमेंट आणि रिलायन्स होम फायनान्सच्या बोर्ड मॅनेजमेंमध्ये सहभागी झाले. जपानची कंपनी निप्पॉनला रिलायन्स कॅपिटलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनमोल अंबानी यांनी मोलाची भूमिाक बजावी. यामुळे कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 40 टक्के वाढ झाली.
लक्झरी कारचा छंद
जय अनमोल अंबानी यांची एकुण संपत्ती जवळपास 20 हजार कोटी इतकी सांगितली जात आहे. त्यांना लक्झरी कारचा छंद आहे. त्यांच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या कारचा समावेश आहे. यात रोल्स-रॉयस फँटम, आणि लेम्बोर्गिनी गेलार्डो सारख्या कार्स आहेत. याशिवाय त्यांच्याकडे खासगी हेलिकॉप्टर आणि एक खासगी प्लेनसुद्धा आहे. जय अंबानी यांचं लग्न निकुंज एंटरप्राईजेस लिमिटेडचे माजी पूर्व अध्यक्ष निकुंज शाह यांची मुलगी खीशा शाहबरोबर झालं आहे.