इमारत कोसळून दोघांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

ढिगाऱ्याखाली १४ जण अडकल्याची भीती

Updated: Jul 14, 2019, 08:09 PM IST
इमारत कोसळून दोघांचा मृत्यू; बचावकार्य सुरु  title=

शिमला : हिमाचल प्रदेशमधील सोलन जिल्ह्यातल्या कुमारहट्टी या ठिकाणी ४ मजली इमारत कोसळून २ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी आसाम रायफलचे ३० जवान आणि ७ नागरिक उपस्थित होते. त्यापैकी १८ जवान आणि ५ नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. 

कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली १४ जण अडकल्याची भीती वर्तवली जात असून, त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. दुर्घटना घडलेल्या कुमारहट्टी या ठिकाणी जेवणाचा ढाबा आहे. त्या ठिकाणी आसाम रायफलचे जवान जेवणासाठी थांबले होते. तर ढाब्याच्या ठिकाणी पार्टीही सुरु होती. त्यावेळी इमारत कोसळली. जखमींना नजिकच्या धर्मपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे.