कर्नाटकात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

 ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची  भीती

Updated: Nov 11, 2018, 11:49 AM IST
कर्नाटकात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली title=

बंगळुरु : कर्नाटकात बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळलीय. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची  भीती व्यक्त करण्यात येतेय. बंगळुरूतल्या त्यागराज नगर परिसरात ही दुर्घटना घडलीय. इमारतीत काम सुरू असतानाच ती अचानक कोसळली. त्यामुळे इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक मजूर अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे . मात्र अद्यापही कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.