नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत बजेट सादर करण्यास सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पात पहिल्याच टप्प्यात आरोग्य क्षेत्रासाठी यंदा 64 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी मोदी सरकार वेगवेगळ्या योजना नव्यानं आणणार आहे. इतकच नाही तर काही योजनांचा विस्तार करण्यावर भर देण्यात आला आहे.
कोरोना संकंटानंतरचं हे पहिलं बजेट आहे. या बजेटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तीन टप्प्यामध्ये आरोग्यावर भर देत असल्याचं सांगितलं आहे. आजार होऊ नये यासाठी, आजार झाल्यावर आणि आजारांसाठी उपलब्ध असणाऱ्या सोयीसुविधा अशा तीन टप्प्यांमध्ये हा निधी विभागला जाणार आहे.
बजेटच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
17 नवे पब्लिक हेल्थ युनिट स्थापन केले जाणार Budget2021
25 हजार 180 कोटींची तरतूद आरोग्य केंद्र उभारण्यासाठी
17 हजार ग्रामीण आणि 11 हजार शहरी आरोग्य केंद्र- नॅशनल हेल्थ मिशनद्वारे सहाय्य केलं जाणार
मिशन पोशन 2.0 आज नव्यानं लाँच केलं जात आहे. पोषण आहारासाठी ही नवीन योजना सुरू केली जाणार
जल जीवन मिशन योजनेवर अधिक भर दिला जाणार
प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यावर भर दिला जाणार
प्रदूषण कमी करण्यासाठी स्कॅपिंग पॉलिसी आणली जाणार
जुन्या वाहनांमधून होणारं प्रदूषण रोखण्यासाठी ही योजना
प्रत्येक वाहनाची तपासणी आणि चाचणी केली जाणार
खासगी वाहनासाठी 20 तर कर्मशीयल वाहनांसाठी 15 वर्षांनी तपासणी आवश्यक
35 हजार कोटींची कोरोना लशीसाठी तरतूद
गेल्या काहीवर्षात वीज निर्मिती क्षेत्रात मोठी प्रगती- अर्थमंत्री
वीज वितरण कंपन्यांचा पर्याय ग्राहकांसाठी खुला केला जाणार
नॅशनल हायड्रोजन मिशनची स्थापना
11,000 किलोमीटर महामार्गांचं काम पूर्ण, मार्च 2022पर्यंत 8500 किलोमीटर अंतराचे महामार्ग पूर्ण करण्यावर भर
रस्त्यांसाठी 1.18 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.