नवी दिल्ली : आयकर भरणाऱ्या नोकरदार वर्गाचे लक्षही अर्थसंकल्पाकडे लागलं आहे. आयकरात सूट मिळण्याची अपेक्षा नोकरदार वर्गाला आहे. वैयक्तीत करदात्यासाठी कर सवलतीची मर्यादा ६ लाख २५ हजार करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. आतापर्यंत ५ लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त आहे. जर या उत्पन्नाची मर्यादा वाढवल्यास नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आयकर भरणाऱ्या लोकांना टॅक्समधील सूट २.५ लाखावरुन ३ लाखापर्यंत होण्याची शक्यता आहे. तर ५ लाख ते ७.५० लाखापर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के टॅक्स लागण्याची शक्यता आहे. हा एक नवा स्लॅब तयार केला जावू शकतो. तर गुंतवणुकीवरील टॅक्समधील सूट दीड लाखाहून २ लाखापर्यंत केली जाण्याची शक्यता आहे.