Brijbhushan Sharan Singh Case : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष आणि भाजपा खासदार (BJP) बृजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी (Harassment Case) शनिवारी दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) न्यायालयात युक्तिवाद केला. भाजपा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात सापडलेले पुरावे आणि साक्ष हे आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत, असा युक्तीवाद दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सांगितले की, बृजभूषण यांना जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी तक्रारदार महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, बृजभूषण शरण सिंह यांना जेव्हा जेव्हा संधी मिळायची तेव्हा ते महिला कुस्तीपटूंच्या विनयभंगाचा प्रयत्न करत असे. अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट हरजीत सिंग जसपाल यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणी ही सुनावणी पार पडली. बृजभूषण शरण सिंहला आपण काय करत आहोत हे माहित होते आणि म्हणूनच त्याने तक्रारीद्वारे आपली कृती लपवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे त्याचे हेतू उघड झाले, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांचे वकील अतिरिक्त सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी न्यायालयात सांगितले की, बृजभूषण शरण यांच्याविरोधात 6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाची तक्रार केली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी बृजभूषण शरण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. आता या प्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात आरोप निश्चित करण्यासाठी युक्तिवाद सुरू आहेत. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीने काही प्रतिक्रिया दिली आहे की नाही हा प्रश्न नाही. त्यांच्यावर अन्याय झाला हा मुद्दा आहे. दिल्ली पोलिसांनी तक्रारदारांसोबत दिल्लीतील कुस्ती महासंघाच्या कार्यालयात घडलेल्या घटनेचा संदर्भ दिला.
एका महिला कुस्तीपटूने तिच्या तक्रारीत सांगितले की, ताजिकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान बृजभूषणने खोलीत बोलावले आणि जबरदस्तीने मिठी मारली. विरोध केला असता, बृजभूषणने आपण वडिलांसारखे वागत असल्याचे सांगितले. यावरून असे दिसून येते की बृजभूषण यांना आपण काय करत आहोत हे माहीत होते, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले. याच्याशी संबंधित काही घटना आणि तक्रारी आहेत ज्या एफआयआरमध्ये जोडल्या गेल्या आहेत. सीआरपीसीच्या कलम 188 अंतर्गत मंजुरीची आवश्यकता नाही कारण काही घटना भारतात घडल्या आहेत.
कोर्टात उपस्थित राहण्यापासून सूट
बृजभूषण शरण यांच्या विनंतीवरून त्यांना शनिवारी कोर्टात हजर राहण्यापासून सूट देण्यात आली होती. दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सांगितले की बृजभूषण विरुद्ध तीन प्रकारचे पुरावे आहेत, ज्यात लेखी तक्रार, कलम 161 आणि 164 अंतर्गत जबाब समाविष्ट आहे, जे आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे आहेत. आरोप निश्चित करणे न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात आहे.