Bride Video : नववधूचा वडील आणि सासऱ्यांसोबतचा डान्स जोरदार व्हायरल, हा व्हिडिओ पाहून व्हाल खूश

 लग्न सोहळा (Wedding Video) हा डान्स आणि संगिताशिवाय अपूर्ण मानला जातो. अलीकडेच एक जबरदस्त डान्स व्हिडिओ (Bride Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: Aug 5, 2021, 07:33 AM IST
Bride Video : नववधूचा वडील आणि सासऱ्यांसोबतचा डान्स जोरदार व्हायरल, हा व्हिडिओ पाहून व्हाल खूश title=

मुंबई : लग्न सोहळा (Wedding Video) हा डान्स आणि संगिताशिवाय अपूर्ण मानला जातो. वधू -वरांच्या डान्स व्हिडिओची  (Dance Video) सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा होत असते. पण अलीकडेच एक जबरदस्त डान्स व्हिडिओ (Bride Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये या डान्सचे आकर्षण ठरले आहेत ते दोन पापा. यात नवरदेव नाही तर वधू आपल्या वडिलांसोबत आणि सासऱ्यांसोबत एकत्र डान्स करत आहे. हा विशेष व्हिडिओ पाहा.

वधूने दिला रिसेप्शनमध्ये सुखद धक्का 

हा डान्स व्हिडिओ (Dance Video) वधू आणि वरांच्या  (Bride Groom Reception) रिसेप्शनसारखा दिसतो. यामध्ये नववधूचे हात मेहंदीने सजवले आहेत आणि वधूच्या भांगेत सिंदूर भरला गेला आहे. सोनेरी आणि राखाडी कॉम्बिनेशन वधूचा लूक (Brdie Video) अतिशय सुंदर दिसत आहे. व्हिडिओमध्ये, नववधू दोन लोकांसह नाचत आहे. दिलेल्या कॅप्शनवरुन हे स्पष्ट आहे की ते तिचे वडील आणि सासरे आहेत.

तिघांनी डान्स करत माहोल बनविला

या नृत्य व्हिडिओमध्ये, वधूचे तिच्या वडिलांबरोबरच सासऱ्यांशी चांगले बॉन्डिंग आहे. या तिघांनी जबरदस्त डान्स केला आणि स्टेजला आग लावली. ते पाहून, हे स्पष्ट आहे की त्यांची डान्स कोरियोग्राफी (Dance Choreography)  खूप चांगली आहे. तिघांनी एकत्र खूप सराव देखील केला आहे. डान्स सुरु असताना उपस्थितांनी त्यांना चांगली दाद दिल्याचे दिसून येत आहे. त्यावेळी या कार्यक्रमात आलेले मित्र आणि नातेवाईक देखील त्यांच्या डान्सचा खूप आनंद घेत आहेत.आतापर्यंत 1 लाख 8 हजारांहून अधिक लोकांनी हा लग्नाचा डान्स व्हिडिओ पाहिला आहे.