सप्तपदी आधी होणाऱ्या बायकोनंच केला गेम, पोलिसांसमोर ढसाढसा रडला नवरदेव

सहजीवनाची स्वप्न रंगवलेल्या नवरदेवासोबत होणाऱ्या पत्नीनंच फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. 

Updated: Jun 30, 2021, 10:57 PM IST
सप्तपदी आधी होणाऱ्या बायकोनंच केला गेम, पोलिसांसमोर ढसाढसा रडला नवरदेव title=

मुंबई: नुकतंच एका मुलीनं भर मंडपात नवरदेवाला मला लग्न न करण्याचा हट्ट 6 फेरे पूर्ण झाल्यावर घडल्याचा प्रकार समोर आला. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा होणाऱ्या बायकोनं नवरदेवाचा गेम केल्याची धक्कादायक घटना समोर आली. या खेळात नवरदेव फसला आणि घात झाला. अखेर लग्नमंडपातून नवरदेवानं पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांसमोर बसून नवरदेव ओक्सबोक्शी रडू लागला. 

सहजीवनाची स्वप्न रंगवलेल्या नवरदेवासोबत होणाऱ्या पत्नीनंच फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. लग्नाच्या मुहूर्तापर्यंत सर्व विधी नववधूनं पूर्ण केले. ऐन लग्नाच्या दिवशी लग्न मंडपात न येता तरुणी आपल्या प्रियकरासोबत पसार झाली. या घटनेमुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला. या घटनेनंतर तरुणी-प्रियकाची शोधाशोध सुरू झाली. 

हा संपूर्ण प्रकार पोलीस ठाण्यापर्यंत गेला आणि पोलिसांनी छडा लावून दोघांना पकडलं. उत्तर प्रदेशातील वाराणसी इथल्या चौबेपूर गावातील ही घटना समोर आली. दारात लग्नाची वरात येताच तरुणीनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत धूम ठोकली. 

घरच्यांना या गोष्टीची भनक लागली तेव्हा आपलं नाक कापलं जाऊ नये या भीती आणि दडरणाखाली ते होते. या प्रकरणी तरुणीच्या आई-वडिलांसह नवरदेवानं पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी काही तासांत दोघांनीही पकडून संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. 

आपली इच्छा पूर्ण न झाल्यानं नवरदेव पोलिसांसमोर ढसाढसा रडू लागला. लग्नाची वरात मंडपाऐवजी थेट पोलिसांच्या दारात आणावी लागल्यानं त्याला रडू कोसळलं. रंगवलेल्या स्वप्नांना सुरूंग लागल्यानं नवरदेव रडू लागला. या प्रकरणी मुलगी अल्पवयीन असल्यानं पोलिसांनी तिला कुटुंबियांच्या हवाली करण्यास नकार दिला तर प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.