मुंबई : भारतीय संस्कृती (Indian Culture) अशी परंपरा आहे जी जगाच्या एखाद्या कोपऱ्या दिसते. मोठ्यांना मान देणं हा भारतीय संस्कृतीचा मुख्य हेतू असतो. घरातल्या मोठ्या व्यक्तींना सन्मान देण्यासाठी घरातले लहान मंडळी त्यांच्या पाया पडताता आणि मोठ्यांचे आशिर्वाद घेतो. कोणत्याही कार्यक्रमात लहान मोठ्यांचे आशिर्वाद घेतात. महत्त्वाचं म्हणजे विवाह सोहळ्यांमध्ये मोठ्यांचा मान ठेवण्यासाठी नवरा-नवरी मोठ्यांचे आशिर्वाद घेत नव्या आयुष्याची सुरूवात करतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. नवरीला पाठवणीचा कार्यक्रम सुरू आहे. नवरी तिच्या वडिलांसोबत उभी आहे. तेव्हा त्यांच्या जवळ नवरदेव येतो आणि सासऱ्यांच्या पायापडून आशिर्वाद घेतो. पण जेव्हा नवरी वडिलांचे आशिर्वाद घेण्यासाठी वाकते तेव्हा नवरदेव सासऱ्यांच्या पायावर डोकं ठेवून आशिर्वाद घेतो.
त्यानंतर नवरी ढसाढसा रडू लागते. अत्यंत भावूक करणारं हे दृष्य आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी लाईक केलं आहे. शिवाय या व्हिडिओवर कमेन्टचा पाऊस पडत आहे.