आईला किचनमध्ये होणारा त्रास बघवला नाही, 17 वर्षीय पठ्ठ्याने बनवली 'रोबो गर्ल' करते 'हे' कामं

काही दिवसांपूर्वी गोव्यातील एका रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराने आपल्या अपंग मुलीसाठी एक रोबोट तयार केला आहे. हा रोबोट तिची काळजी घेईल आणि तिला खायला देईल, आता केरळमधील एका 17 वर्षाच्या मुलाने आपली जबरदस्त प्रतिभा दाखवून एक महिला रोबोट तयार केला जो स्वयंपाकघरात काम करेल आणि त्याला जेवण आणि पाणी देईल.

Updated: Oct 21, 2022, 06:09 PM IST
आईला किचनमध्ये होणारा त्रास बघवला नाही, 17 वर्षीय पठ्ठ्याने बनवली 'रोबो गर्ल' करते 'हे' कामं  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी गोव्यातील एका रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगाराने आपल्या अपंग मुलीसाठी एक रोबोट तयार केला आहे. हा रोबोट तिची काळजी घेईल आणि तिला खायला देईल, आता केरळमधील एका 17 वर्षाच्या मुलाने आपली जबरदस्त प्रतिभा दाखवून एक महिला रोबोट तयार केला जो स्वयंपाकघरात काम करेल आणि त्याला जेवण आणि पाणी देईल.

वास्तविक, केरळच्या कन्नूर जिल्ह्यात राहणाऱ्या या मुलाचे नाव मोहम्मद शियाद असून तो अवघा 17 वर्षांचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा रोबोट बनवण्याची कल्पना त्या मुलाला सुचली जेव्हा तो करोनाच्या काळात आपल्या आईची मदत आणि काळजी घेण्यासाठी योजना बनवण्याचा विचार करत होता. आईला काही तरी मदत करावी असे त्याला वाटले.

त्यानंतर त्यानं त्या रोबोटवर काम सुरू केलं. दरम्यान, मुलाला शाळेचा प्रोजेक्टही आला आणि त्यानं या प्रोजेक्टअंतर्गत हा रोबोट बनवला. रोबोट तयार करण्यासाठी प्लास्टिक, अॅल्युमिनियम शीट, महिला डमी, सर्व्हिंग प्लेट्स इत्यादींचा वापर करण्यात आला. त्या मुलाने स्वतः सांगितले की रोबोटमध्ये अल्ट्रासोनिक सेन्सर बसवण्यात आला आहे. या सेन्सरद्वारे ते ऑपरेट आणि नियंत्रित केले जाते. ते बनवण्यासाठी सुमारे दहा हजार रुपये लागले.

तो म्हणाला की रोबोट त्याच्या आईला प्रत्येक गोष्टीत मदत करतो. त्यानं या रोबोटला पथूटी असे नाव दिले आहे आणि मुलीचा पोशाखही तिने परिधान केला आहे. हा रोबोट स्वयंपाकघरात मदत करतो आणि जेवणाच्या टेबलावर जेवण ठेवतो. याशिवाय पाणीही आणते. या रोबोटचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.