नवी दिल्ली : विरोधकांचे अधिवेशन म्हणजे भित्र्या लाकांचा घोळका अशा, तीव्र शब्दांत भाजपने विरोधकांची खिल्ली उडवली आहे. विरोधकांच्या वतीने आयोजित केलेल्या 'सामायिक वारसा जतन करा' या अधिवेशनात राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली होती. त्याला केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर देताना हे विधान केले.
रविशंकर प्रसाद यांनी, केरळमध्ये होत असलेल्या भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांच्या हत्येबाबत विरोधक गप्प का बसतात, असा सवाल यावेळी विचारला. तसेच, केरळमध्ये माकपाच्या गुंडांकडून आरएसएस कार्यकर्त्यांच्या निर्घृण हत्यांवर कॉंग्रेसचा विचार काय आहे? की हाच कॉंग्रेसचा संस्कृती आणि वारसा जनत करण्याचा एक घटक आहे? राहुल गांधी यांचे याबाबत मत काय? असहिष्णुतेचा मुद्दा पूढे करून पुरस्कार परत करणारे तथाकथीत बुद्धिजीवी आता कोठे आहे, असा प्रश्नांचा भडीमारच प्रसाद यांनी केला आहे.
विरोधकांचे एकत्र येणे म्हणजे घाबलेल्या लोकांची आघाडी आहे. हे लोक मोदींना घाबरले असून, हे लोक भ्रष्टाचार कसा लपवायचा याबाबत चिंतीत असल्याचा आरोपही प्रसाद यांनी विरोधकांवर केला आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी या आधी अधिवेशनात भाजप आणि आरएसएसवर जोरदार टीका केली होती. हे लोक संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्व जनतेने एकत्र येऊन त्याचा सामना करायला हवा असेही गांधी यांनी म्हटले होते.