बंगळुरु : कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेचा संघर्ष वाढत चालला आहे. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येदियुरप्पा यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेऊन सर्वात मोठा पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी संधी द्यावी अशी विनंती केलं आहे. जनता दल सेक्युलर (जेडीएस) चे नेता एचडी कुमारस्वामीने पत्रकारांशी बोलतांना म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पदाचा दुरुपयोग करत आहेत. मला आणि माझा पक्षाला सत्ता नको आहे. भाजप आमदारांना 100 कोटींची आणि मंत्रीपदाची ऑफर देत आहे. हा काळापैसा कुठून आला. आयकर अधिकारी कुठे आहेत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
कुमारस्वामी यांनी म्हटलं की, जेडीएस आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे. आमच्याकडे बहुमत आहे. जर राज्यपाल वजुभाई वाला भाजपला आधी सरकार बनवण्याचं आमंत्रण देतात तर जेडीएस आणि काँग्रेस राजभवनच्या बाहेर आंदोलन करतील. याविरोधात ते आजच कोर्टात जाणार आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या बैठकीत 25 विधायक गायब होते. दुसरीकडे जेडीएसच्या बैठकीत देखील 2 आमदार गायब होते. याधी भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचा दावा केला आहे. जेडीएसच्या आमदारांना फोडण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांची भेट घेतल्याची देखील चर्चा आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी येडियुरप्पा यांची नियुक्ती झाली असून ते राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.