बंगळुरु : आज कर्नाटकमध्ये 3 लोकसभा आणि 2 विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणूकीचा निकाल आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सरुवात झाली. लोकसभेच्या बेल्लारी, शिवमोगा आणि मांडया या लोकसभेच्या 3 तर रामनगर आणि जामखंडी या विधानसभा 2 जागांसाठी पोटनिवडणूक झाली. ही निवडणूक काँग्रेस-जेडीएस आघाडीसाठी अग्निपरीक्ष होती. कारण यामुळे त्यांचं आगामी निवडणुकीचं भविष्य ठरणार होतं.
- पहिल्या चरणात मतमोजणीमध्ये शिमोगा लोकसभेज्या जागेवर भाजपचे बीवाय राघवेंद्र हे जेडीएसच्या एस मधु बंगारप्पा पेक्षा 3906 मतांनी पुढे होते.
- जामखंडीमध्ये काँग्रेसचे आनंद सिद्धू न्यामगौड़ा भाजपच्या कुलकर्णी श्रीकांत सुबराव यांच्यापेक्षा 44433 मतांनी पुढे आहेत.
- रामनगर विधानसभा निवडणुकीत जेडीएसच्या अनिता कुमारस्वामी भाजपच्या एल चंद्रशेखर यांच्या पेक्षा 8430 मतांना पुढे आहेत.
- बेल्लारीमध्ये काँग्रेसचे वीएस उग्रप्पा भाजपच्या जे शांता यांच्यापासून 17480 मतांना पुढे आहेत.
कर्नाटक निवडणूक आगामी लोकसभेच्या दृष्टीकोनातून सर्वच पक्षांसाठी महत्त्वाच्या आहेत. भाजपसह काँग्रेस आणि जेडीएसने देखील या निवडणुकीत आपली पूर्ण ताकद लावली होती.
लोकसभेच्या 2 जागेवर आतापर्य़ंत भाजपचं वर्चस्व होतं. तर एक जागेवर जेडीएसचं वर्चस्व होतं. 2 जागेवर विजय मिळवला तरी भाजपसाठी ही आनंदाची बातमी असेल. तर विधानसभेच्या जागेवर विजयानंतर काँग्रेस- जेडीएसचा देखील आत्मविश्वास वाढणार आहे.