'मौका मौका' म्हणत भाजपचा काँग्रेसवर पलटवार!

गुजरात विधानसभेच्या निवडूकीच्या तारखा अजून ठरल्या नसल्या तरी बीजेपी आणि कांग्रेसची लढाई सुरु झाली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 18, 2017, 05:59 PM IST
'मौका मौका' म्हणत भाजपचा काँग्रेसवर पलटवार! title=

गांधीनगर : गुजरात विधानसभेच्या निवडूकीच्या तारखा अजून ठरल्या नसल्या तरी बीजेपी आणि कांग्रेसची लढाई सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  एका महिन्यात चार वेळा गुजरात दौरा केला. तर राहुल गांधींनी देखील गुजरात यात्रा केली. सोशल मीडियावर देखील दोन्ही पक्षांनी आपले अभियान सुरु केले आहे आणि मतदारांना आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. या सगळ्या प्रयत्नांत एकमेकांवर प्रहार करण्यात देखील दोन्ही पक्ष कुठे कमी पडत नाहीत.  हे सगळे करत असताना काँग्रेसने सोशल मीडियावर 'विकास पागल हो गया है' हा ट्रेन्ड चांगलाच चालवला. बीजेपीचे अपयश आणि कामचुकारपणा अधोरेखित करण्याचा हा काँग्रेसचा प्रयत्न होता. 

बीजेपीने याचे चांगलेच प्रतित्युत्तर दिले. यासाठी बीजेपीचे नेता विजय चौथाईवाले  व्हिडीओ क्लिप ट्विट केली आहे. 'मौका मौका' या टीव्ही कमर्शियल पासून प्रेरित झालेली ही क्लिप आहे. या काँग्रेसचे गेल्या १५ वर्षातील चुका, कामचोरी दाखवण्यात आली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बीजेपीचे नेता विजय हे बीजेपीचे परराष्ट्र कारभाराचे प्रमुख आहेत. या व्हिडिओतून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, "ज्या लोकांना प्रश्न आणि उत्तर आतील फरक कळत नाही. ते गुजरातमध्ये आपले प्रशासन आणण्याचे स्वप्न पाहत आहेत."

केंद्रीय मंत्री स्‍मृति ईरानी यांनी देखील विजय यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याबरोबरच या व्हिडिओवर देखील प्रतिक्रिया दिले आहे.