पणजी : गोव्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झालीय. सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडेही १४ आमदार आहेत. दोन आमदार फोडून भाजपनं काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या प्रयत्नांना सुरूंग लावालाय. पण हा सुरुंग लावताना भाजपनचे काही आमदार नाराज आहेत.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरांना पराभूत करुन आमदारकी मिळावणाऱ्या काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांनी भाजपाच्या वरीष्ठांनी भाजपामध्ये घेतल्यानं गोवा भाजपमध्येच तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
गोव्याच्या राजकीय घडामोडींवर बारिक लक्ष ठेवून प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी पणजीत असलेले आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडेंनी पार्सेकरांच्या घरी जाऊन त्याचं मनोगत जाणून घेतलं. यावेळी जनादेश नसताना सत्ता स्थापन करणेही ही घोडचूक असल्याचंही पार्सेकरांनी म्हटलंय. गेल्या दीड वर्षात गोव्याची जनता भाजपापासून दूर गेल्याची खंतही पार्सेकरांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या सविस्तर मुलाखतीत व्यक्त केलीय.