BJP चा या पक्षाला मोठा दणका, सगळ्या आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

VIP MLA JOIN BJP : विकासशील इंसान पक्षाला मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या सर्व आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

Updated: Mar 23, 2022, 07:33 PM IST
BJP चा या पक्षाला मोठा दणका, सगळ्या आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश title=

पटना : बिहार सरकारमध्ये पशुपालन मंत्री आणि विकासशील इंसान पक्षाचे संस्‍थापक मुकेश सहनी (Mukesh Sahani) यांना मोठा झटका बसला आहे. त्यांच्या पक्षाच्या ३ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राजू सिंह, मिश्री लाल आणि सवर्णा सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी तिन्ही आमदारांना मान्य़ता दिली आहे. यावर मुकेश सहनी यांनी आपल्याला याबाबत अजून काहीही माहिती नसल्य़ाचं म्हटलं आहे. (VIP party MLA join BJP in Bihar)

VIP च्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता मंत्री मुकेश सहनी एकटे पडले आहेत. याआधी बिहार NDA मधून ते आऊट झाले आहेत. काही दिवसांपासून त्यांचे भाजपसोबत (Bihar BJP) मतभेद सुरु होते.

उत्तर प्रदेशनंतर आता बिहारमध्येही भाजपशी मुकाबला करणे मुकेश सहनी यांना जड झाले आहे. मुकेश सहनी यांच्या पक्षाच्या तीन आमदारांनी आज पक्षांतर केल्याचं समोर य़ेत आहे. मुकेश साहनी यांच्या पक्षाचे बिहारमध्ये तीन आमदार आहेत.

व्हीआयपी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुकेश सहनी (Mukesh Sahani) यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत महाआघाडीपासून फारकत घेत एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. एनडीएमध्ये त्यांच्या पक्षाचे 3 आमदार आहेत. ते सर्व भाजपचे नेते असले तरी त्यांनी व्हीआयपी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मुकेश साहनी हे एनडीएमध्ये एमएलसी निवडणुकीत अनेक जागांचे दावेदार होते पण त्यांना एनडीएने एकही तिकीट दिले नव्हते. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी विधान परिषदेच्या अनेक जागांसह मुझफ्फरपूरच्या बोचाहान विधानसभा पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभा केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात एनडीएमध्ये नाराजी होती.