वाढता वाढता वाढे... भाजप बनला सर्वात श्रीमंत पक्ष

 भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयाला आलाय. भाजपकडे सर्वात जास्त पक्षनिधी जमा झालाय. २०१६-१७ या आर्थिक वर्षात भाजपकडे तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा निधी जमा झालाय. सर्व पक्षांचा निधीतला जवळपास ६६ टक्के निधी हा एकट्या भाजपकडे आहे. त्यामुळे भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष ठरलाय.

Shubhangi Palve Updated: Apr 10, 2018, 07:06 PM IST
वाढता वाढता वाढे... भाजप बनला सर्वात श्रीमंत पक्ष  title=

नवी दिल्ली : भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष म्हणून उदयाला आलाय. भाजपकडे सर्वात जास्त पक्षनिधी जमा झालाय. २०१६-१७ या आर्थिक वर्षात भाजपकडे तब्बल १ हजार ३४ कोटी रुपयांचा निधी जमा झालाय. सर्व पक्षांचा निधीतला जवळपास ६६ टक्के निधी हा एकट्या भाजपकडे आहे. त्यामुळे भाजप हा देशातला सर्वात श्रीमंत पक्ष ठरलाय.


राजकीय पक्षांची संपत्ती 

काँग्रेसकडे २२५ कोटींचा पक्ष निधी जमा झालाय. तर तिसऱ्या क्रमांकावर बहुजन समाज पक्षानं मुसंडी मारलीय.

बीएसपीकडे १७३ कोटींचा निधी आलाय. तर राष्ट्रपादी काँग्रेस पक्षाचंही उत्पन्न वाढलं असून थेट ९ कोटींवरून निधी १७ कोटींवर गेलाय.