भाजपकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, मोदी म्हणाले, 'बंगालमध्ये विजय निश्चित'

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर 

Updated: Mar 10, 2021, 04:15 PM IST
भाजपकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, मोदी म्हणाले, 'बंगालमध्ये विजय निश्चित' title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने (BJP)बुधवारी पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत प्रचारासाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, (PM modi) गृहमंत्री अमित शहा (Amit shah), जेपी नड्डा (JP nadda), उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aadityanad) आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakroborty) यांच्या नावांचा समावेश आहे. भाजपने 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीसाठी (West Bengal Election) भाजपने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये टीएमसी (TMC) सोडून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचा समावेश नाही. मिथुन चक्रवर्ती वगळता टीएमसीच्या कोणत्याही बंडखोर नेत्याचे नाव या यादीत नाही. संसदीय पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, बंगालमध्ये भाजपचा विजय निश्चित आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी असे पंतप्रधान म्हणाले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, निर्मला सीतारमण, डॉ. एस. जयशंकर आणि प्रह्लाद पटेल यांच्यासह अनेक प्रमुख नेते या बैठकीस उपस्थित होते.

40 स्टार प्रचारकांची यादी - (BJP star campaigner)

पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांमध्ये राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अर्जुन मुंडा, धर्मेंद्र प्रधान, स्मृती इराणी, कैलाश विजयवर्गीय, शिवप्रकाश, मुकुल रॉय, दिलीप घोष, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, फग्गन सिंग कुलस्ते, मनसुख भाई मांडविया, जुवेल ओराम, राजीब बॅनर्जी, अरविंद मेनन, अमित मालवीय, बाबुल सुप्रियो, देबाश्री चौधरी, नरोत्तम मिश्रा, बाबूलाल मरांडी, रघुवर दास, लॉकेट चॅटर्जी, राजू बनर्जी, अमिताव चक्रवर्ती, ज्योतिर्मय सिंह महतो, सुभाष सरकार, कुनार हेमबरम, यशदास गुप्ता, श्रबंती चॅटर्जी, हिरेन चॅटर्जी आणि पायल सरकार.

आसामच्या 126 विधानसभा जागांसाठी तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यात 47 जागा आहेत. दुसर्‍या टप्प्यात 1 एप्रिलला 39 जागांसाठी मतदान होणार आहे. तिसर्‍या आणि अंतिम टप्प्यातील 40 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. (Assam Election 2021)

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुडुचेरी या इतर चार राज्यांसह सर्वांची मतमोजणी 2 मे रोजी होईल. आसाममधील विधानसभेची मुदत 31 मे रोजी संपत आहे. 2016 च्या निवडणुकीत भाजपाने येथे 15 वर्ष सत्तेत असलेल्या कॉंग्रेसला पराभूत केले. भाजपने 86 जागा जिंकल्या होत्या. (Assembly election 2021)