देशाच्या ७७ टक्के जनतेवर दबादबा असलेल्या, भाजपचं मूळ जाणून घ्या...

 देशाची ७७ टक्के लोकसंख्येवर दबदबा आणि २० पेक्षा अधिक राज्यांमध्ये सत्तेत असलेला भाजप हा पक्ष जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचं सांगितलं जात आहे.

Jaywant Patil Updated: Apr 6, 2018, 03:28 PM IST
देशाच्या ७७ टक्के जनतेवर दबादबा असलेल्या, भाजपचं मूळ जाणून घ्या... title=

मुंबई : देशाची ७७ टक्के लोकसंख्येवर दबदबा आणि २० पेक्षा अधिक राज्यांमध्ये सत्तेत असलेला भाजप हा पक्ष जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असल्याचं सांगितलं जात आहे. भाजप ६ एप्रिल रोजी  आपला ३८ वा स्थापना दिवस साजरा करीत आहे, मात्र भाजपाचा इतिहासही आता काँग्रेससारखाच जुना आहे. 

भाजपाचं मूळ हे भारतीय जनसंघाशी जुळलेलं आहे. जनसंघाची स्थापना ऑक्टोबर १९५१ साली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली आहे. ते 1947 साली स्वतंत्र भारताचे पहिले कॅबिनेट सदस्य होते. देशातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत (1951-52) जनसंघाला ३ जागांवर विजय मिळवता आला. तेव्हा जनसंघाला देशातील ४ राष्ट्रीय पक्षाच्या यादीत स्थान मिळालं.

डॉ श्‍यामा प्रसाद मुखर्जी

जनसंघने काश्मीर आणि कच्छ एकिकरणाची मागणी केली, जमीनदारी आणि जहागीदारी विरोधात आवाज उठवला. काश्मीरमध्ये प्रवेश परवानगीविरोधात डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी आंदोलन चालवलं. यासाठी त्यांना ४५ दिवसाची जेल झाली. तुरूंगातच २३ जून १९५३ ला त्यांचं निधन झालं. या दरम्यान जनसंघाने एक नारा दिला, 'नहीं चलेंगे एक देश में दो विधान, दो प्रधान और दो निशान.'

अटल बिहारी वाजपेयी पहिले खासदार

दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत १९५७ साली जनसंघाला ४ जागा मिळाल्या, या दरम्यान अटल बिहारी वाजपेयी हे पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. लालकृष्ण आडवाणी त्यांच्या मदतीसाठी दिल्लीला आले. जेव्हा चीनने १९६२ साली भारताविरोधात युद्ध पुकारलं तेव्हा, आरएसएस-जनसंघाने सरकारच्या विनंतीवरून नागरी पोलीस दलाची भूमिका पार पाडली. पंडित नेहरू यांनी १९६३ मध्ये रिपब्लिक डेच्या परेडला आरएसएसला आमंत्रित केलं.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा गूढ मृत्यू

लोकसभा निवडणुकीत १९६२ला जनसंघाला १४ जागा मिळाल्या. १९६५ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धा दरम्यान संघ स्वयंम सेवकांनी सिव्हिलियन ड्युटीच्या स्वरूपात सेवा दिली. यानंतर चौथ्या लोकसभा निवडणुकीत जनसंघाला एकूण ३५ जागा मिळाल्या.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा १९६८ मध्ये गूढ मृत्यू झाला. तेव्हा १९६९ मध्ये अटल बिहारी वाजपेयी भाजप अध्यक्ष झाले. एप्रिल १९७० साली लालकृष्ण अडवाणी राज्यसभेसाठी निव़डले गेले. एप्रिल १९७१ मध्ये भारतीय जनसंघाने 'गरीबी विरोधात युद्ध'चा नारा दिला. त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला २२ जागा मिळाल्या. लालकृष्ण आडवाणी १९७३ मध्ये जनसंघाचे अध्यक्ष झाले.

जनता पार्टी

जयप्रकाश नारायण यांनी १९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारविरोधात संपूर्ण क्रांतीचा नारा दिला, जनसंघासोबत हातमिळवणी केली. यावेळी त्यांनी सांगितलं जर जनसंघ कट्टरवादी आहे, तर मी देखील कट्टरवादी आहे. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावली. याच पार्श्वभूमीवर १९७७ साली निवडणुका झाल्या. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पार्टीची स्थापना झाली. या स्थापनेदरम्यान जनसंघात बीएलडी, काँग्रेस-ओ, समाजवादी आणि सीएफडी विलीन झाले. यावेळी १९७७ मध्ये जनता पार्टीने २९५ जागा जिंकून काँग्रेसला सत्तेच्या बाहेर केलं.

जनता पार्टीच्या सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी मंत्री आणि एलके अडवाणी सूचना आणि प्रसारण मंत्री झाले. जनता पार्टीचा प्रयोग अंतर्गत विरोधामुळे ३० महिन्यात फसला. जनसंघाच्या एका गोटाने ६ एप्रिल १९८० साली भारतीय जनता पार्टी म्हणजेच भाजपची स्थापना केली, आणि अशा प्रकारे भाजपमधून जनसंघाचा उदय झाला.