लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि रिल्सची नशा, अडसर ठरणाऱ्या रिअल लाईफ पतीला संपवलं

Killer Wife Rani: सोशल मीडियावर रिल्स बनवून लाईक आणि सबस्क्राईबवर वाढण्याचं व्यसन तरुण पिढीला लागलंय. यासाठी स्वत:चं जीव धोक्यात घालण्यासही ते मागे पुढे बघत नाही. पण एका रिल्स स्टारने अडसर ठरणाऱ्या स्वत:च्या पतीचीच हत्या केली. 

राजीव कासले | Updated: Jan 11, 2024, 08:15 PM IST
लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि रिल्सची नशा, अडसर ठरणाऱ्या रिअल लाईफ पतीला संपवलं title=

Killer Wife Rani: सोशल मीडियावर व्ह्यूज, लाईक, सबस्क्राईब आणि शेअरचं देशातल्या तरुणाईला अक्षरश: व्यसन लागलं आहे. यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालण्यासही ते मागे-पुढे पाहात नाहीत. पण एका महिला रिल्स स्टारने (Reels Star) अडसर ठरणाऱ्या आपल्या पतीचीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधल्या (Bihar) बेगुसराय जिल्ह्यातील ही घटना असून या रिल्स स्टार महिलेचं नाव राणी असं आहे. राणी रिल्स बनवून सोशल मीडियावर शेअर करायची. तिचे फॉलोअर्सही दिवसेंदिवस वाढत होते. पण रिल्सच्या नादात तिच्या रिअल लाईफमध्ये मात्र उलथापालथ झाली. 

रिल्सच्या नादात पतीची हत्या
राणीला रिल्सचं अक्षरश: वय्सन लागलं होतं. पती महेश्वरन तिला रिल्स बनवण्यापासून रोखल्याने तीने कुटुंबासोबत कट रतच पती महेश्वरची निर्घृण हत्या केली. सात वर्षांपूर्वी राणी आणिमहेश्वरचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर राणी अनेक तास व्हिडिओ बनवण्यात घालवून लागली. व्हिडिओच्या नादात ती काही अनोळखी तरुणांनाही भेटत होती. ही गोष्ट पती महेश्वरला खटकायची त्यामुळे तो राणीला रिल्स बनवण्यापासून रोखू लागला. पण राणीला रिल्सचं इतकं व्यसन लागलं होतं की कोणत्याही परिस्थितीत ती या आभासी जगतातून बाहेर येऊ इच्छित नव्हती. सोशल मीडियावर राणीचे दहा हजार फॉलोअर्स होते. आक्षेपार्ह आणि अश्लिल गाण्यांवर ती रिल्स बनवायची. याच गोष्टीवरुन राणी आणि महेश्वरमध्ये रोज जोरदार भांडणं होत होती. 

पतीनची निर्घृण हत्या
25 वर्षांच्या महेश्वरचा मृतदेह त्याच्या सासरी संशयास्पद स्थितीत आढळला. महेश्वर हा समस्तीपुरच्या नरहन गावात राहात होता आणि नोकरीनिमित्ताने तो कोलकत्यात होता. काही दिवसांपूर्वीच तो कोलकात्यावरुन बिहारमध्ये परतला होता. त्यानंतर पत्नीला आणण्यासाठी त सासरी बेगुसराय इथं गेला. पण राणी आणि तिच्या कुटुंबियांनी त्याची गळा दाबून निर्घृण हत्या केली. 

अशी उघडकीस आली घटना
महेश्वर रविवारी म्हणजे सात जानेवारीला रात्री नऊ वाजता सासरी गेला होता. जवळपास दीड तासांनी म्हणजे रात्री साडे दहा वाजता त्याचा मोठा भाऊ रुदलने कोलकत्याहून त्याला फोन केला. पण बराचवेळ रिंग वाजूनही महेश्वर फोन उचलत नसल्याने रुदनने आपल्या वडिलांना याची माहिती दिली. वडिल रात्रीच बेगुसरायसाठी निघाले. पण तिथे त्यांना आपल्या मुलाचा मृतदेह आढळला. याची माहिती त्यांनी तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. महेश्वरची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. 

राणीचे अवैध संबंध
रिल्स बनवत असताना राणीची ओळख शहजाद नावाच्या एका मुलाशी झाली. दोघांचं प्रेमप्रकरण सुरु झालं. त्यामुळे पती महेश्वरचं बोलणं तिला खटकू लागलं. महेश्वरला कायमचा संपवण्याचा कट तिने आखला. हत्येच्या दिवशी राणीने महेश्वरला सासरी बोलावून घेतलं. त्यानंतर प्रेमी शहजाद आणि बहिणीबरोबर मिळून महेश्वरची गळा दाबून हत्या केली. 

भारतात 45 हजार कोटींची रिल्स इंडस्ट्री
एका अहवालानुसार प्रत्येक भारतीय जवळपास 40 मिनिटं रिल्स पाहातो. ज्याला याचं व्यसन आहे ती व्यक्ती जवळपास पाच ते सहा तास रिल्स पाहण्यात घालावते. यात 18 ते 34 वयोगटातील तरुण वर्गाचा जास्त समावेश आहे. देशात सध्या 8 कोटी प्रोफेशनल कंटेट क्रिएटर आहेत. विशेष म्हणजे रिल्सची ही इंडस्ट्री जवळवपास 45 हजार कोटी रुपयांची आहे.