बिहार निवडणूक : भाजप - संयुक्त जनता दल यांच्यात जागा वाटप निश्चित

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि संयुक्त जनता दलाची युती पक्की. जागा वाटपही निश्चित.

सुरेंद्र गांगण | Updated: Nov 1, 2018, 05:06 PM IST
बिहार निवडणूक : भाजप - संयुक्त जनता दल यांच्यात जागा वाटप निश्चित title=

नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झालंय. आगामी निवडणुकीत दोन्ही पक्ष समसमान जागा लढणार आहेत. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ही जागावाटपाची घोषणा केली.

2019 Lok Sabha elections: BJP, JDU to contest on equal number of seats in Bihar

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बिहारमधल्या ४० जागांपैकी भाजपा आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १६ जागा लढवेल. तर रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीसाठी ६ तर उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक समता पार्टीला २ जागा सोडण्यात येणार आहेत. 

New political equations ahead of 2019? Meet between Tejashwi Yadav, Upendra Kushwaha triggers talks

मात्र या घोषणेनंतर अल्पावधीतच कुशवाह यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्यात. अर्थात, कुशवाह यांनी या भेटीमागे कोणतंही राजकारण नसल्याचा खुलासा केला असला तरी बिहारमधल्या सत्ताधारी आघाडीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा यानिमित्तानं सुरू झाली आहे.