Bihar Crime: काकाने पुतण्याच्या मानेवर चाकू फिरवून गळा चिरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमध्ये नौतन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नुनीरवा टोला गावात ही घटना घडली. येथे काकाने पुतण्याची चाकू भोसकून हत्या केली. त्याचवेळी मृताच्या वडिलांसह पाचजण जखमी झाले. मृत पावलेला मुलगा अवघ्या 7 वर्षांचा आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
शालू कुमार (७ वर्षे) असे मृताचे नाव असून आरोपीचा भाऊ संजय राम यांचा तो मुलगा आहे. घटनेनंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. या घटनेत शालूचे वडील संजय राम, आई पिंकी देवी, काका लालसा कुमार, आजी बदामी देवी, काकू आशा देवी, चुलत बहीण पिंकी कुमारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोषी देवी यांना अटक केली आहे. अन्य आरोपींच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. मृत्यूमुखी पडलेला शालू कुमार हा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी होता.
शालूच्या मानेच्या उजव्या बाजूला चाकूने वार करण्यात आले आहेत, अशी माहिती जीएमसीएच चौकीचे प्रभारी श्यामकिशोर प्रसाद यांनी दिली. मृताच्या वडिलांनी त्याचा भाऊ पन्नालाल राम, मेहुणी संतोषी देवी, पुतण्या विकास कुमार आणि बेतिया येथील बसवारिया येथे राहणारे विवेक कुमार यांच्यासह चार अज्ञात व्यक्तींवर त्याच्या हत्येचा आरोप केला असल्याची माहिती नौतन पोलिसांनी दिली.
आरोपी आणि त्याचे चार भाऊ वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्यावरुन भांडत होते. त्यातला एक भाऊ पन्नालाल राम नगरच्या बसवरिया परिसरात कुटुंबासह राहतो. ते पुस्तानी जमिनीत 10 कट्टा जमिनीचा हिस्सा मागत होता. आपापसात बोलून जमिनीची वाटणी करुया असे भावांचे म्हणणे होते.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी संजय राम हे कुटुंबीयांसह शेतातून लावणी करून परतले. त्यावेळी पन्नालाल राम हे इतर आरोपींसोबत आधीच दारात उभे होते. संजय तेथे पोहोचताच आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला.
चाकू हल्ला झाल्यावर संजय यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून घरातील महिला आणि मुले बाहेर आली आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. संजय यांच्या अवघ्या 7 वर्षांचा मुलगा मध्ये आला. त्यावेळी आरोपींनी शालू कुमारच्या मानेवर चाकूने वार केले. त्यामुळे तो जखमी होऊन तिथेच पडला.
नातेवाईकांनी जखमी शालूला जीएमसीएचमध्ये नेले. पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे.
शालू हा सरस्वती विद्या मंदिर बरवट सेनेत इयत्ता दुसरीत शिकत होती. त्याच्या मृत्यूनंतर आई पिंकी देवी, आजी बेदामी देवी, मोठा भाऊ पाचवीत शिकणारा सनी कुमार, लहान भाऊ यूकेजीचा विद्यार्थी सचिन कुमार आणि इतर नातेवाईकांची रडून वाईट अवस्था झाली आहे.