धक्कादायक! इथे मुलंही वापरतायत सॅनिटेरी नॅपकिन, का होतंय असं?

मुलांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्यासाठी चक्क सरकार योजनेतून आर्थिक निधी दिला जातो

Updated: Jan 26, 2022, 07:52 PM IST
धक्कादायक! इथे मुलंही वापरतायत सॅनिटेरी नॅपकिन, का होतंय असं? title=

Sanitary Pad Scam :  मुलींसाठी वापरण्यात येणारे सॅनिटरी नॅपकिन्स मुले वापरतात, ऐकूण तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना. बिहारमधल्या सारण जिल्ह्यातील छपरा इथल्या एका सरकारी शाळेत हा प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेत डझनभर मुलांना सॅनिटरी नॅपकिन वापरण्यासाठी चक्क सरकार योजनेतून आर्थिक निधी दिला जातो.

नेमकी काय आहे घटना?
हे विचित्र प्रकरण छपराच्या मांझी ब्लॉकमधील हलखोरी साह हायस्कूलमधलं आहे. शाळेचे मुख्याध्यापक निवृत्त झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. दुसऱ्या मुख्याध्यापकांनी पदभार स्वीकारला तेव्हा त्यांनी केलेल्या तपासात सॅनिटरी नॅपकिनसाठी मुलींना दिला जाणारा निधी चक्क मुलांना दिला जात असल्याचं आढळून आलं.

इयत्ता नववी आणि दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सॅनिटरी नॅपकीन खरेदी करण्यासाठी सरकारी मदत दिली जात होती. आणि ही सरकारी मदत त्यांना तीन वर्षांपासून मिळत होती.

करोडो रुपयांचा घोटाळा
सुमारे एक कोटीच्या योजनांचा वापर प्रमाणपत्र नसल्यामुळे नवनियुक्त मुख्याध्यापकांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली. तेव्हा त्यांना मुलींसाठी चालवल्या जाणाऱ्या योजनांचे पैसे मुलांच्या खात्यात जमा झाल्याचं बँकेच्या स्टेटमेंटमध्ये आढळून आले.

मांझी ब्लॉकच्या हलकोरी साह हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी नितीश कुमार सरकार राज्यातील विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्यासाठी दरमहा दीडशे रुपये देते.

या प्रकरणाचा तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली. मुलींच्या नॅपकीनची रक्कम मुलांच्या खात्यात वळते करण्यात आले होते. सरकारकडून मुलींना देण्यासाठी येणाऱ्या सॅनिटरी नॅपकिनची संपूर्ण रक्कम लाटण्यात आली आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

या संदर्भात सारणचे जिल्हा शिक्षण अधिकारी अजय कुमार सिंह यांनी सांगितले याप्रकरणाचा अधिक तपास सुरु असल्याचं म्हटलं आहे. अनेक लाभार्थी विद्यार्थिनींच्या नावांमध्ये काही मुलांची नावं असून याची सत्यता तपासली जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.