खुशखबर ! ग्राहकांच्या तक्रारी नंतर Recharge वॅलिडिटी बाबत TRAI चा महत्त्वाचा निर्णय

मोबाईल रिचार्जबाबत कंपन्यांना आता ग्राहकांना 30 दिवसांची वैधता द्यावी लागणार आहे.

Updated: Sep 12, 2022, 09:46 PM IST
खुशखबर ! ग्राहकांच्या तक्रारी नंतर Recharge वॅलिडिटी बाबत TRAI चा महत्त्वाचा निर्णय title=

नवी दिल्ली : दूरसंचार नियामक TRAI ने आज एक नवीन आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, आता दूरसंचार कंपन्यांना कोणत्याही परिस्थितीत 30 दिवसांचा किमान एक प्लॅन ऑफर करावा लागणार आहे. ग्राहकांच्या तक्रारीनंतर ट्रायने हा निर्णय घेतला आहे. एप्रिल महिन्यात, ट्रायने या संदर्भात कंपन्यांना सूचना जारी केल्या होत्या की त्यांना प्लॅन व्हाउचर आणि प्लॅन व्हाउचर नूतनीकरण श्रेणीमध्ये किमान एक असा दर आणावा लागेल, ज्याची वैधता 30 दिवस असेल.

ग्राहकांकडून वारंवार तक्रारी आल्यानंतर ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा करून हा आदेश जारी करण्यात आला आहे. या अंतर्गत, दूरसंचार सेवा प्रदात्याला कोणत्याही परिस्थितीत 30 दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज कूपन आणि विशेष व्हाउचर ऑफर करावे लागतील.

मोबाईल टॅरिफमध्ये दोन श्रेणी आहेत. पहिली श्रेणी वैधता कालावधीवर आधारित आहे. दुसरी श्रेणी त्याच तारखेला नूतनीकरणावर आधारित आहे. त्याला एक महिन्याची योजना असेही म्हणतात. दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या विविध श्रेणींमध्ये ३० दिवसांच्या वैधतेच्या योजनांबद्दल ट्रायने संपूर्ण माहिती शेअर केली आहे.

30 दिवसांची वैधता असलेला Airtelचा प्लॅन रु. 128 आहे, तर पुढच्या महिन्यात त्याच तारखेला नूतनीकरण करणार्‍या प्लॅनचे टॅरिफ रु. 131 आहे. रिलायन्स जिओचा 30 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन 296 रुपये आहे, तर पुढील महिन्यात त्याच तारखेला नूतनीकरणासाठी 259 रुपयांचा प्लॅन आहे. Vodafone Idea चा 30 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन Rs 137 आहे, तर पुढच्या महिन्यात त्याच तारखेला रिन्यू होणारा प्लॅन Rs 141 आहे. 

बीएसएनएलचा 30 दिवसांचा प्लॅन 199 रुपयांचा आहे, तर एक महिना वैधता प्लॅन 229 रुपयांचा आहे. एमटीएनएलचा 30 दिवसांचा प्लॅन 151 रुपये आहे, तर त्याच तारखेच्या नूतनीकरणाचा प्लान एका महिन्यासाठी म्हणजेच पुढच्या महिन्यात 97 रुपये आहे.