देशातील 'या' भागात प्रचंड बर्फवृष्टीमुळं पर्यटक अडचणीत; लष्कर ठरलं देवदूत

भारतीय लष्करानं लगेचच ...

Updated: Dec 27, 2021, 11:50 AM IST
देशातील 'या' भागात प्रचंड बर्फवृष्टीमुळं पर्यटक अडचणीत; लष्कर ठरलं देवदूत  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

सिलीगुडी : सध्या देशभरात हिवाळा चांगलाच जोर धरताना दिसू लागला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्यानं देशातील विविध भागांमध्ये तापमान खाली जात आहे. त्यातच आता सिक्कीम येथील चांगू तलाव परिसरास शेकडो पर्यटक अडकल्याची बातमी समोर येत आहे. 

प्रचंड बर्फवृष्टीमुळं ओढवलेल्यचा या संकटानंतर भारतीय लष्करानं लगेचच या ठिकाणी बचाव पथक पाठवत अडकलेल्या नागरिकांपर्यंत मदत पोहोचवली. 

लष्कराकडूनच सदरील माहिती देण्यात आली. 

अडकलेले सर्व पर्यटक नाताळच्या सुट्टीनिमित्तानं तिथे पोहोचले होते. तेव्हाच बर्फवृष्टीनं अधिक जोर धरला. ज्यामुळं जवाहर लाल नेहरु रोड पूर्णपणे बंद झाला. 

लष्करानं अतिशय प्रयत्नांनंतर पर्यटकांनासुरक्षित स्थळी हलवत त्यांना आपल्या तळांवरही नेलं. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पर्यटकांना लहान गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. ज्यानंतर लष्कराच्या जवानांनी त्याना 40 किमी दूर असणाऱ्या गंगटोक येथे पोहोचवण्यात आलं. 

चांगू लेक परिसरात ओढवलेल्या या संकटामुळं लष्करापुढे एक मोठं आवाहन उभं राहिलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार अजकलेल्या लोकांमध्ये बहुतांश कोलकाता येथील असल्याचं निदर्शनास आलं.