दिल्लीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 39 गाड्या घटनास्थळी

भीषण अग्नितांडवानं हादरलं दिल्ली, पाहा आगीची भीषणता दाखवणारा व्हिडीओ 

Updated: Jun 12, 2022, 08:07 AM IST
दिल्लीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या 39 गाड्या घटनास्थळी title=

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत आगीच्या घटना समोर येत आहेत. याआधी गेल्या दोन दिवसांत भीषण आग लागल्याची घटना समोर आली होती. आज पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं समोर आलं आहे. 

गफ्फार मार्केटमध्ये भीषण आगडोंब पाहायला मिळाला. आगीची माहिती मिळताच 39 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचं समोर आलं नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

गल्ली क्रमांक 13 -14-15 मधील दुकानांना आग लागली. त्यानंतर ही आग वेगानं पसरत गेली. पहाटे चारच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली आहे. सध्या अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.