एक्सप्रेस रेल्वेला भीषण अपघात, रुळावरून 6 डबे घसरले, पाहा कुठे झालाय अपघात?

प्राथमिक माहितीनुसार 12 डब्यांना बसला फटका, रेस्क्यू ऑपरेशन सुरू, इंजिनपासून पुढे घसरले 6 डबे

Updated: Jan 13, 2022, 06:31 PM IST
एक्सप्रेस रेल्वेला भीषण अपघात, रुळावरून 6 डबे घसरले, पाहा कुठे झालाय अपघात? title=

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात झाला आहे. रेल्वे रुळावरून 6 डबे घसरल्याची माहिती मिळाली आहे. बीकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. 6 ते 7 डबे रुळावरून घसरले आहेत. मध्य रात्रीपर्यंत या ट्रेनला गुवाहाटीपर्यंत पोहोचायचं होतं. 

पश्चिम बंगालमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार इंजिनपासून पुढील 6 डबे रुळावरून घसरले आहेत. या घटनेची माहिती मिळताच आपत्कालीन विभाग, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. 

या अपघाचा फटका 10 डब्यांपर्यंत बसला आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात येत आहे. 24 कोचपैकी 6 कोच रुळावरून घसरल्याची माहिती मिळाली आहे. 

या अपघातात 3 प्रवासांच्या मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृतांचा आकडा वाढण्य़ाची भीती व्यक्त केली जात आहे.