सीरम इंस्टिट्यूटला मोठा झटका; लहान मुलांसाठीच्या लसींच्या ट्रायल्सला परवानगी देण्याबाबत सरकारी पॅनला मोठा निर्णय

सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाला मोठा झटका बसला आहे.

Updated: Jul 1, 2021, 10:49 AM IST
सीरम इंस्टिट्यूटला मोठा झटका; लहान मुलांसाठीच्या लसींच्या ट्रायल्सला परवानगी देण्याबाबत सरकारी पॅनला मोठा निर्णय title=

मुंबई : सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाला मोठा झटका बसला आहे. सीरम इंस्टिट्यूटला सरकारी पॅनेलने 2-17 वयाच्या मुलांसाठी कॉव्होव्हॅक्सच्या लसीच्या चाचणीची परवानगी देण्यास नकार दिला आहे. सीरम इंस्टिट्यूटने सोमवारी ड्रग कंट्रोलर ऑफ जनरल ऑफ इंडियाला अर्ज केला होता. या अर्जामध्ये 10 ठिकाणच्या 920 लहान मुलांवर कॉव्होव्हॅक्सची ट्रायल चाचणीसाठी परवानगी मागितली होती.

मात्र भारताच्या औषध नियंत्रक मंडळाच्या सरकारी पॅनेलने कोवोवॅक्सच्या चाचण्यांना परवानगी नाकारली. ह्या लसीला अजून कोणत्याही देशाने लहान मुलांसाठी मान्यता दिली नसल्याचं सांगत सीरमला परवानगी नाकारण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यापासून कोरोनावरील ‘कोवोव्हॅक्स’ लसींचं उत्पादन सुरु झालं आहे. भारतात कोवोव्हॅक्स लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे कोवोव्हॅक्स ही लस दक्षिण आफ्रिका तसंच ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. सप्टेंबर 2020मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. 

कोवोव्हॅक्स लसीला मान्यता मिळाली असती तर ती मुलांवर ट्रायल चाचणी होणारी तिसरी लस बनली असती. यापूर्वी, भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि जाइडस कॅडिलाच्या ZyCov-D या लसींच्या मुलांवर चाचण्या सुरू आहेत.

कोवोव्हॅक्स लसीची खास वैशिष्ट्ये

कंपनीचे म्हणण्याप्रमाणे, कोवोव्हॅक्सच्या डोसनंतर जर एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला तर लसीपासून तयार केलेले अँटीबॉडीज त्याच्या स्पाइक प्रोटीनला लॉक करतील. हे विषाणू पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखू शकतील आणि त्या व्यक्तीस संसर्ग होणार नाही