भय्यू महाराजांच्या मोबाईलवर ७ कॉल कुणाचे?, महाराष्ट्राच्या वाटेवरून परतले घरी

....

Updated: Jun 13, 2018, 01:39 PM IST
भय्यू महाराजांच्या मोबाईलवर ७ कॉल कुणाचे?, महाराष्ट्राच्या वाटेवरून परतले घरी title=

मुंबई: आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वामुळे जनमानसावर भूरळ घालणाऱ्या भय्यू महाराजांची धक्कादायक आत्महत्या चर्चेचा विषय ठरली आहे. दुसरी पत्नी आणि कन्या यांच्यातील संघर्षामुळे त्यांच्या जिवनात प्रचंड तणाव होता अशी चर्चा आहे. एखाद्या राजासारखे आयुष्य जगणाऱ्या या माणसाचा मृत्यूही एखाद्या राजासारखीच दंतकथा बनला. त्यांच्या मृत्यूबाबत सुसाईड नोटसह अनेक मुद्द्यांची चर्चा होत आहे. त्यापैकीच एक म्हणजे मृत्यूपूर्वी काही काळ आगोदर त्यांच्या मोबाईलवर आलेले 'ते' ७ कॉल. महाराज महाराष्ट्राच्या वाटेवर होते. पण, कॉल येताच ते अर्ध्या वाटेवरून घरी परतले. त्यामुळे हे कॉल नेमके कुणाचे होते याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत.

गाडीत एकांतात संवाद

भय्यू महाराजांच्या आत्महत्येबाबतचे अनेक पैलू पुढे येत आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासात असेही पुढे आले आहे की, भय्यू महाराज सोमवारी इंदोरहून महाराष्ट्राकडे येण्यासाठी निघाले होते. ते सेंधवापर्यंत आलेही होते. पण, प्रवासादरम्यान त्यांच्या मोबाईलवर ७ वेळा कॉल आला. कॉल येताच महाराजांनी गाडीतील लोकांना खाली उतरवले आणि गाडीत बसून एकट्यानेच संवाद केला. मोबाईलचे बोलने संपताच त्यांनी सेंधवातूनच गाढी परत फिरवली आणि ते इंदोरला परतले, असा दावा अमर उजालाने आपल्य वृत्ता केला आहे.

पोलीस तपास अद्यापही सुरूच

दरम्यान, पोलिसांनी याच मुद्द्यावर भय्यू महाराजांसोबत महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या लोकांचीही चौकशी केली. मात्र, ते कॉल कुणाचे होते याबाबत त्या लोकांनाही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांचा तपास अद्यापही सुरूच आहे.