....म्हणून भारती Airtelला जबर फटका

अनेकांनी फिरवली पाठ 

Updated: Nov 22, 2019, 11:00 AM IST
....म्हणून भारती  Airtelला जबर फटका title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : भारती एअरटेल Airtel या दूरसंचार सुविधा पुरवणाऱ्या कंपनीला मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागत आहे. जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत जम्मू- काश्मीर येथील परिसरातून जवळपास २५ ते ३० लाख उपभोक्त्यांनी या सेवेतून काढता पाय घेतल्याचं कळत आहे. सदर भागात वारंवार दूरसंचारावर लावण्यात आलेल्या निर्बंधामुळे ही परिस्थिती उदभवल्याची माहिती संपनीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. 

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक गोपाळ विठ्ठल यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीच्या २५ ते ३० लाख उपभोक्त्यांनी सेवेतून काढता पाय घेणं हा तोडा असला तरीही तो दीर्घकाळासाठी टीकून राहणार नाही. येत्या काळात कंपनी या अडचणींवर मात करेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. 

संबंधित भागात पुन्हा एकदा प्रीपेड सुविधा/ दूरसंचार सुविधा सुरु केल्यानंतर ग्राहक/ उपभोक्ते पुन्हा एकदा या सेवेकडे परत येतील अशी आशा विठ्ठल यांनी व्यक्त केल्याचं वृत्त 'द हिंदू'कडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 

जम्मू आणि काश्मीर परिसरात काही महत्त्वाच्या कारणास्तव दूरसंचारावर असणारे निर्बंध पाहया आणखी एका गोष्टीचाही भारती एअरटेलला फटका बसलाय हा घटक म्हणजे जिओ फोन. जिओचा वाढता वापर. या फोनच्या दरांणध्ये सातत्याने होणार घट, त्याकडे इतरांचा वाढता कल या साऱ्यामुळेही कंपनीची गणितं बिघडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तेव्हा आहा परिस्थिती सुधारण्यासाठी भारती एअरचेलकडून कोणती पावलं उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.