दिल्ली । अखिल भारतीय वकील संघाने भारत बंदला आपला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देताना तिस हजारी जिल्हा न्यायालयाच्या येथे निदर्शने केली. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत, असे वकील संघाने म्हटले आहे.
Delhi: All India Lawyers' Union protests at Tis Hazari District Court, in support of #BharatBandh
"Govt’s response to protest is a matter of concern. Legal fraternity stands with farmers. These laws are neither in favour of farmers nor of lawyers,” says Tiz Hazari Bar assn pres pic.twitter.com/REjFLNB66W
— ANI (@ANI) December 8, 2020
जालना । शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये जालन्यात काँग्रेसने पाठिंबा देत सहभाग नोंदवला.भारत बंद निमित्त जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील मामा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधात केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.
मुंबई । शेतकरी कायद्याला होणार विरोध आणि भारत बंद आंदोलन या मुद्द्यावर प्रतिहल्ला चढवण्याची भाजपने रणनीती आखली आहे. शेतकरी कायद्याबद्दल व्यापक जनजागृती करण्याची रणनीती भाजप आखत आहे. आमदार - खासदार - पदाधिकारी - कार्यकर्ते यांच्यामार्फत लोकांमध्ये जात शेतकरी कायदा कसा उपयुक्त आहे, योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न यापुढच्या काळात केला जाणार आहे. या प्रचारासाठी कुठलाही मुहूर्त न निवडता स्थानिक पातळीवर खास करून ग्रामीण भागात जनजागृती मोहीम अंमलात आणण्याची रणनीती भाजप तयार करत आहे.
लातूर । केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या लातूर बंद मध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसात बाचाबाचीचेही प्रसंग घडले. लातूर बंदचे आवाहन करण्यासाठी शिवसेनेने मोटारसायकल रॅली काढली. ही रॅली गंजगोलाईकडे जात असताना पोलिसांनी हनुमान चौकात अडवली. यावेळी पोलिसांनी गंजगोलाईत रॅली घेऊन जाण्यास मज्जाव केला.
मुंबई : गोवंडीतील समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांनी बैलगाडीत बसून एक रॅली काढली आणि शिवाजीनगर चौकात येऊन रास्ता रोको केला. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत शेतकरी विरोधी कायदा मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी अबू आझमी यांना बैल गाडीतून खाली उतरवत त्यांना ताब्यात घेण्यात आले.
मुंबई । भारत बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने दहिसर मालाड कांदिवली परिसरात आंदोलन करण्यात आला केंद्र सरकारच्यावतीने शेतकऱ्याच्या विरोधात जे बिल पास करण्यात आले ते परत घेण्यात यावे व जय जवान जय किसान अश्याप्रकारे घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते यांनी भारत बंद मध्ये सहभाग घेण्यात आला.
नागपूर । ऑटोमोटिव्ह चौकात गुरुद्वारा प्रबंधन समिती, ट्रान्सपोर्ट असोसिएशन आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यावेळी येथे वाहतूक कोंडी झाली होती. मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कृषी विधेयक मागे घेण्याची आंदोलकांची मागणी केली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.
नवी मुंबई । आंदोलनकर्त्यांनी पुन्हा सायन पनवेल महामार्ग रोखला. अत्तापर्यत तीन वेळा महामार्ग रोखला गेला आहे. महामार्ग रोखून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी तसेच मीडिया विरोधात देखील घोषणा करण्यात आली.
कृषी कायद्याच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलं इंडिया नवी मुंबई ट्रान्सपोर्ट आणि गुरुद्वारा तर्फे कार आणि बाईक रॅली च आयोजन करण्यात आले. मुंबईच्या मरीन ड्रॉईव्ह येथे मानवी साखळी तयार करून शांततेत विरोध प्रदर्शन करणार होते. परंतु त्यांना मुंबई पोलिसांनी रोखून धरले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी काही काळा पुरता सायन पनवेल महामार्ग रोखून धरला होता यामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती.
मनमाड । केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसह दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनमाडला किसान सभा घेण्यात आली. काँग्रेस उतरली रस्त्यावर उतरली होती. मनमाड बाजार समितीपासून मोर्चा काढण्यात आला होता. तर आंदोलकांनी पुणे-इंदौर महामार्गावर रास्ता रोकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कल्याण । केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन दुकाने आणि रिक्षा बंद केल्या. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे. मात्र, सकाळपासून काही प्रमाणात दुकाने आणी रिक्षा सुरु होत्या त्यामुळे दुपारी १२ वाजल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी दुकाने आणी रिक्षा बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरले.
सोलापूर । शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज माकपच्यावतीने चक्का जाम करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा चक्का जाम मोडीत काढत कार्यकर्त्यांची धरपकड केली. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात महिलांचा भव्य मोर्चा निघाला होता, या मोर्चाने, सोलापूर-विजयपूर रोडवर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजसमोर चक्का जाम आंदोलन केले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता याच फौजफाट्याने चक्का जाम मोडीत काढला. माजी आमदार नरसय्या आडम यांना देखील पोलीसांच्या ताब्यात घेतले.
उत्तर प्रदेश । भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी गाझीपूर-गाझियाबाद (दिल्ली-उत्तर प्रदेश) सीमेवर निदर्शने केली. दरम्यान, जर सरकार कायदा बनवू शकते तर ते कायदा देखील रद्द करू शकतात, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
Farmers’ associations demonstrate at Ghazipur-Ghaziabad (Delhi-UP) border as part of #BharatBandh call.
“If govt can make law they can repeal it as well. They must work with farmer associations and experts. We'll leave only after we get it in writing,” says a farmer leader. pic.twitter.com/2XYp8RdgeO
— ANI (@ANI) December 8, 2020
दिल्ली । शेतकरी आंदोलनाबाबत (Farmers Protest) विरोधक मुद्दा भरकटविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला आहे. माझे नाव घेऊन मुद्दा भरकटवला जातोय, पत्र नीट वाचलेच नसल्याचे शरद पवारांनी वक्तव्य केले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पवारांचे पत्र वाचून त्यांच्या कृषी कायद्याला पाठिंबा होता असे म्हटले होते. त्याला पवारांनी उत्तर दिले आहे. आताच्या कायद्यात एपीएमसी हिताचा उल्लेख नसल्याचा पवारांचा आरोप आहे.
दिल्ली । भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या अनेक बॉर्डर सील, प्रयागराज आणि बिहारमध्ये रेलरोको, विशाखापट्टणममध्ये हायवेवर कबड्डी तर जयपूरमध्ये काँग्रेस-भाजप समोरासमोर
अहमदनगर । दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा पाठिंबा । राळेगणसिद्धी येथे पद्मावती मंदिरात एक दिवसाच मौन आंदोलन । उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के जास्त हमीभाव मिळावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. कृषिमूल्य आयोगाला संविधानिक स्वायत्तता द्यावी. मागण्या मान्य झाल्या नाही तर शेतकऱ्यांसाठी दिल्लीत माझं शेवटचं आंदोलन करेल, असा इशाराही सरकारला दिला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बाबत केलेल्या कायद्याबाबत माहिती घेऊन बोलू, असे ते म्हणाले.
सांगली । केंद्र सरकारच्या कृषि कायद्याच्या विरोधात सांगली बंद. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सांगली बंदची हाक दिली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सर्व पक्षीय कार्यक्रत्यनकडून मोटर सायकल रॅली काढण्याचं प्रयत्न पोलिसांनी मोटर सायकल रॅली अडवली. पोलीस आणि कार्यकर्त्यांनमध्ये वादावादी झाली. मोटर सायकल रस्त्यावर उंभे करून आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन सुरु केले.
तेलंगणा ।
Telangana: TRS leaders K Kavitha and KT Rama Rao protest in Kamareddy and Ranga Reddy respectively, along with other leaders & workers of the party, in support of #BharatBandh called by Farmer Unions against Centre's #FarmLaws pic.twitter.com/2F8J7B9zxg
— ANI (@ANI) December 8, 2020
मुंबई । दुटप्पी असल्याच्या भाजप नेते देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. त्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे. सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कायद्याच्या मूलभूत तत्त्वांना विरोध केलेला नाही याकडेही लक्ष वेधले.
It's no political Bandh. It's our sentiment. Farmer orgs agitating in Delhi aren't carrying any political flag. It's our duty to stand in unity with farmers & stay connected to their sentiments. There is no politics here & there shouldn't be: Sanjay Raut, Shiv Sena#BharatBandh pic.twitter.com/Tog5HpURX8
— ANI (@ANI) December 8, 2020
जो शेतकरी रस्त्यावर उतरला आहे त्याला कोणतंही राजकीय पाठबळ नाही हे महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्याने समजून घेतलं पाहिजे. त्याच्या हातात कोणताही राजकीय झेंडा नाही. त्यामुळे आपण विरोधी पक्षनेते म्हणून आपण काय भूमिका मांडत आहोत याचा त्यांनी विचार केला पाहिजे. तेही पाठिंबा देतील, असे राऊत म्हणाले.
दिल्ली । देशभरातील शेतकरी संघटनांनी (Farmers Protest) कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws) आज भारत बंदची (Bharat Bandh) हाक दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नुकतेच पार पडलेल्या तीन कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन करीत आहेत. दरम्यान, शेतकरी आणि सरकार यांच्यात पाच फेरीत तोडगा निघाला नाही. आज देशात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीने दिल्ली पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी नरजकैद केल्याचे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. पक्षाने म्हटले आहे की, 'अरविंद केजरीवाल यांना शेतकर्यांसह एकत्र आल्यावर घराबाहेर पडू दिले नाही.'
मुंबई । मुंबईतली वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू, लाईफ लाईन लोकलसेवा, बेस्टच्या फेऱ्या सुरळीत, टॅक्सी, रिक्षा, मोनो, मेट्रोही सुरूच, राज्यात बँकांचे व्यवहार सुरू
झारखंड । शेतकऱ्यांच्या भारत बंदच्या समर्थनार्थ डाव्या पक्षांनी रांची येथे बाईक मोर्चा काढला.
Jharkhand: Protestors raise slogans and go on a march in Ranchi on account of #BharatBandh, against the new farm laws. pic.twitter.com/Xk1E8muLYq
— ANI (@ANI) December 8, 2020
मुंबई । मुंबईच्या डब्बेवाल्यांनी भारत बंदला आपला पाठिंबा दर्शविला आहे. सोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी याची घोषणा केली.
Andhra Pradesh: Left political parties and Students' Federation of India (SFI) protest at NH 16 in Visakhapatnam, in support of #BharatBandh called by farmer unions. pic.twitter.com/NNF4vcaQCE
— ANI (@ANI) December 8, 2020
प्रयागराज । समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते रेल्वेसमोर झोपले आणि रेल्वे बंद केली
नवी दिल्ली । -भारत बंदमुळे दिल्लीतील लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. टिकरी, झौदा, धनसा सीमा वाहतुकीसाठी बंद आहेत. बडूसराय सीमा हलकी वाहनांसाठी खुली आहे. झटिकारा सीमा केवळ दुचाकी वाहनांसाठी खुला आहे. हरियाणाला जाण्यासाठी दौराळा, कापशेरा सीमा उघडली आहे. बिजवासन, पालम विहार आणि दुंधेरा सीमा उघडल्या आहेत.
Bihar: Rashtriya Janata Dal (RJD) workers burn a tyre at Ganj Chowk in Darbhanga, in protest against Central Government, and show their support to #BharatBandh called by farmer unions. pic.twitter.com/kea7UwpQlN
— ANI (@ANI) December 8, 2020
हरियाणा । 'भारत बंद' पाहता हरियाणा पोलिसांनी आवाहन केलेआहे. हरियाणातील विविध रस्ते आणि महामार्गांवर धरणे आंदोलन करणारे गट दिसून येत आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. नूह आणि नारनौल वगळता राज्यातील बहुतेक सर्व जिल्ह्यात मोठ्या किंवा लहान मार्गावर वाहतूक ठप्प होऊ शकते, अशी परिस्थिती आहे.
- बंदचा अंशत: परिणाम दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातमध्ये दिसून येत आहे.
Karnataka: Congress leaders protest in support of #BharatBandh called by farmer unions, raise slogans against the Centre & show black flags, in front of Gandhi statue at Vidhana Soudha in Bengaluru.
Party leaders Siddaramaiah, BK Hariprasad, Ramalinga Reddy and others present. pic.twitter.com/YptI0ENQlg
— ANI (@ANI) December 8, 2020
- पंजाब, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशात बंदचा व्यापक परिणाम दिसून येत आहे. जहानाबादमध्ये पलामू एक्स्प्रेस गाडी रोखण्यात आली होती. जहानाबादमध्ये पलामू एक्स्प्रेस गाडी थांबली गेली.
दिल्ली । भारत बंदचा फटका देशातील अनेक राज्यांत दिसून येत आहे. दिल्लीच्या अनेक सीमा बंद आहेत. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बिहारमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी बस आणि गाड्या थांबविण्यात आल्या आहेत. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली होती. पंजाबच्या मोहालीमध्ये टोल नाका बंद होता.
अमृतसरमध्ये बंदच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
ठाणे । भारत बंदला ( Bharat Bandh) राज्यात संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. शेतकरी आंदोलनाच्या (Farmers Protest) समर्थनार्थ ठाण्यात चक्काजाम आंदोलन (Chakka Jam agitation inThane) करण्यात आले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर झोपून आंदोलन केले. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर । महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात भारत बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, याबद्दल मला समाधान वाटतं आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. एका अर्थाने सर्वसामान्य नागरिक देखील शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे स्पष्ठ झाल्याच देखील शेट्टी म्हणालेत.
कल्याण । शेतकरी संघटनांनी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदला कल्याण एपीएमसी मार्केटने कडकडकीत बंद पाळून पाठिंबा दिला आहे. कल्याण स्टेशन परिसरात नेहमीपेक्षा कमी वर्दळ दिसून येत आहे. तसेच कल्याण एसटी डेपोमध्येही नेहमीप्रमाणे कामावर जाणाऱ्या लोकांची आणि बाहेरगावी जाणाऱ्या बसेसची गर्दी कमी आहे.
रायगड । दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी पुकारलेल्या भारत बंदला रायगड जिल्ह्यात अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही . आज सकाळपासून हॉटेल्स , भाजीविक्रेते स्टॉल व इतर सर्व प्रकारची दुकाने उघडली आहेत . शेतकरी कामगार पक्षाचा गड असलेल्या अलिबाग शहरात सर्व व्यवहार सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले . जिल्ह्याच्या अन्य भागातही बंदला फारसा प्रतिसाद नाही. लॉक डाऊनमुळे त्रस्त झालेले व्यावसायिक बंदला प्रतिसाद देण्याच्या मानसिकतेत नाहीत , असं चित्र आहे . एसटी वाहतूक सुरू आहे.
पंढरपूर, पुणे । कोल्हापुरात देखील भारत बंदला सकाळच्या सत्रामध्ये समिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. तर पंढरपूरमधल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत बाजार समिती बंद ठेवली आहे. तर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. महाविकास आघाडीसह कम्युनिस्ट पक्ष तसेच विविध संघटना या मोर्चात सहभागी होणार आहेत. असं असताना या मोर्चाला परवानगी देण्यात आली नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राज्यात भारत बंदची हाक महाविकास आघाडीने दिली असली तरी पुणे बंगरुळू महामार्गावर वाहतूक सुरू आहे.
West Bengal: BJP has called a 12-hour bandh in North Bengal today, over the death of a party worker during its protest against the state government in Siliguri yesterday.
Visuals from Siliguri. pic.twitter.com/oVZuFAmRbb
— ANI (@ANI) December 8, 2020
ओडिशा । डावे राजकीय पक्ष, कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांनी भुवनेश्वर रेल्वे स्थानकात रेल्वे थांबविली.
Odisha: Left political parties, trade unions and farmer unions stop trains at Bhubaneswar Railway Station.
Farmer Unions have called #BharatBandh today, over Centre's #FarmLaws. pic.twitter.com/C63X69FSlE
— ANI (@ANI) December 8, 2020
आंध्र प्रदेश। शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आजच्या भारत बंद पाठिंबा देत डाव्या राजकीय पक्षांनी विजयवाड्यात आंदोलन केले, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात निदर्शने केलीत.
Andhra Pradesh: Left political parties stage a protest in Vijayawada, in support of today's #BharatBandh called by farmer unions, against Central Government's #FarmLaws. pic.twitter.com/PsbrFNxlaL
— ANI (@ANI) December 8, 2020
कोलकाता । भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी कम्युनिष्ट पार्टीच्यावतीने जादवपूर येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
पश्चिम बंगाल: लेफ्ट पार्टियों ने कोलकाता के जादवपुर में किसानों के भारत बंद के समर्थन में विरोध प्रदर्शन किया। #BharatBandh pic.twitter.com/t9MdNT9EEV
— ANI_HindiNews (@AHindinews) December 8, 2020
पुणे । पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम दिसून येतोय. फळं आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त १७४ गाड्यांची आज पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक
नवी मुंबई । भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबई एपीएमसीत आज कडकडीत बंद ठेवण्यात आला. एपीएमसीमधील पाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या आहेत. नव्या शेतकरी कायद्यामुळे शेतकऱ्यांसोबत माथाडी कामदारांचाही रोजगाराचा प्रश्न उपस्थित होणार असल्याने माथाडी कामगारही बंदमध्ये सहभागी आहेत.
बुलडाणा । भारत बंदला जोरदार सुरुवात झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरांनी कार्यकर्त्यांसह चेन्नई - अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर रेल्वे स्थानकावर रोखली. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारनं तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलढाणा जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलीय.सकाळी ६.४० वाजता चेन्नई - अहमदाबाद एक्सप्रेस रोखून रविकांत तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला.
Maharashtra: Swabhimani Shetkari Saghtana staged 'Bharat Bandh Rail Roko' protest and briefly stopped a train today in Malkapur of Buldhana dist. They were later removed from the tracks by Police & detained.
Farmer Unions have called #BharatBandh today, over Centre's #FarmLaws pic.twitter.com/syREnd7Iez
— ANI (@ANI) December 8, 2020
पुणे । शेतकऱ्यांच्या आंदोलनाला (Farmers Protest) पुणे येथील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच भारत बंदलाही (Bharat Bandh) पाठिंबा दिला आहे. दरम्यान, पुण्यात व्यापारी महासंघाने (Pune Chamber of Commerce) आपला निर्णय बदलला आहे. पुण्यातील सर्व दुकानं दुपारी १२.३०पर्यंत बंद राहणार आहेत. तर आंदोलनाला पाठिंब्यासाठी मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता बॉलिवूडमधूनही मोठा पाठिंबा । ख्यातनाम अभिनेत्री प्रियंका चोप्रा, सोनम कपूर, प्रिटी झिंटा, तापसी पन्नू शेतकऱ्यांच्या पाठीशी#FarmersProtest #Bollywoodhttps://t.co/HOK58cBO5u pic.twitter.com/48EnkORkU2
— ZEE २४ तास (@zee24taasnews) December 8, 2020
मुंबई : शेतकरी संघटनांनी (workers unions) आज भारत बंद (Bharat Bandh) पुकारला आहे. तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून या शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडले आहे. शेतकरी अधिक आक्रमक झाले आहेत. केंद्र सरकार केवळ चर्चा करत आहे. तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला यश आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) या बंदला विरोधकांनीही पाठिंबा दिला आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार आहे. दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केले आहे.
दरम्यान, १८ विरोधी पक्षांनी या ‘भारत बंद’ला पाठिंबा दिला आहे. दरम्यान या बंदमुळे दिल्लीसह इतर राज्यांतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर दुसरकीडे केंद्र सरकारने २० शेतकरी संघटनांना सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. पंजाबच्या २० शेतकऱ्यांच्या नेत्यांनी केंद्र सरकारला आपला पाठिंबा जाहीर केला. यांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांची काल भेट घेतली.
मुंबईत मात्र सर्व प्रकारची वाहतूक सुरूच राहणार आहे. बेस्ट बसेस ठरलेल्या वेळापत्रकानुसार धावणार असल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिलीय. खबरदारीचा उपाय म्हणून बेस्ट बसेसना लोखंडाच्या जाळ्या बसवल्या जाणार आहेत. शिवसेनेने भारत बंदला पाठिंबा दिला आहे. मुंबई परिसरातल्या टॅक्सीही सुरू राहणार असल्याची माहिती टॅक्सी संघटनांनी दिली आहे. तर संवेदनशील भागात एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
शेतकरी आंदोलनाला बँक संघटनांनी पाठींबा दिला आहे. मात्र आज पुकारलेल्या भारत बंद दरम्यान बँका सुरूच राहणार आहेत. 'भारत बंद'मध्ये बँकांचा सहभाग असणार नाही. त्यामुळे बँकांतील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरुच राहाणार आहेत.
आजच्या भारत बंदला माथाडी कामगार संघटना आणि व्यापारी वर्गाने पाठिंबा दर्शवला आहे. देशातील बळीराजाला साथ देण्यासाठी या संपात सहभागी होणार असल्याचे माथाडी कामगार नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी घोषीत केले आहे. नवी मुंबई एपीएमसीमधील पाचही मार्केट बंद करतानाच राज्यातील नाशिक , पुणे , नगर , कोल्हापूरमधील बाजार समित्याही आजच्या बंदमध्ये सहभागी होणार आहेत.