Bhaiyyu Maharaj | भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी त्या महिलेसह तिघांना 6 वर्षांची शिक्षा

आध्यात्मिक आणि राजकीय गुरु भय्यू महाराज  (Bhaiyyu maharaj) यांच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

Updated: Jan 29, 2022, 04:50 PM IST
Bhaiyyu Maharaj | भय्यू महाराज आत्महत्येप्रकरणी त्या महिलेसह तिघांना 6 वर्षांची शिक्षा title=

भोपाळ : आध्यात्मिक आणि राजकीय गुरु भय्यू महाराज  (Bhaiyu Maharaj) यांच्या आत्महत्येप्रकरणी इंदूर न्यायालयाने (Indore District Court) शुक्रवारी (28 जानेवारी) मोठा निर्णय दिला आहे. न्यायालयाने या प्रकरणी तिघांनी दोषी ठरवलं आहे. इंजून जिल्हा न्यायालयाने मुख्य सेवादार विनायक, ड्रायव्हर शरद आणि एका महिलेला म्हणजेच पलकला दोषी ठरवलं आहे. न्यायालयाने तिघांना एकूण 6 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. भय्यू महाराज यांनी 12 जून 2018 रोजी आत्महत्या केली होती. (bhaiyyu maharaj suicide case indore court has convicted 3 sentenced to 6 years) 

भय्यू महाराजांना या तिघांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. हे तिघे भय्यू महाराजांना पैशांसाठी प्रवृत्त केलं, असा निर्वाळा न्यायालयाने दिला. न्यायालयाने त्यांची शिष्या पलक, शरद आणि विनय या तिघांवर आयपीसीच्या 306 कलमानुसार दोषी ठरवलंय. न्यायालयाने शिष्या पलक, ड्रायव्हर शरद आणि सेवा करणाऱ्या विनायक या तिघांना दोषी ठरवलं आहे. 

आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली होती.  हे तिघेही भय्यू महाराजांचं आर्थिक आणि मानसिक शोषण करत असल्याची माहिती समोर आली होती. भय्यू महाराजांनी सूसाईड नोटमध्ये विनायकचा उल्लेख केला होता. कारण विनायक हा भय्यू महाराजांची गेल्या 16 वर्षांपासून सेवा करत होता.