बँग बँग गाण्यावर लाल साडीतील काकूंचा जबरा डान्स... इंटरनेटवर व्हिडीओने लावली आग

लग्नातील काकूंचा डान्स व्हिडीओ झाला व्हायरल... पडला कमेंट्सचा पाऊस 

Updated: Oct 6, 2022, 07:42 PM IST
बँग बँग गाण्यावर लाल साडीतील काकूंचा जबरा डान्स... इंटरनेटवर व्हिडीओने लावली आग title=

Aunty In Red Saree: सोशल मीडिया ही एक अशी जागा आहे जिथे कधी कोण कसा फेमस होईल हे काहीही सांगता येत नाही (Social media). असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल ( Viral Video on internet) झाला आहे. खरंतर इंटरनेटवर अनेक जण आपापले व्हिडीओ टाकत असतात. मात्र, त्यातील काही व्हिडीओ असे असतात की त्यावरून इंटरनेटवरील जनतेची नजरच हटत नाही. तुम्ही एखादा व्हिडीओ टाकला तर तोही प्रचंड व्हायरल होऊ शकतो, फक्त त्यामध्ये काहीतरी हटके असायला हवं. सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही रातोरात स्टार ( Overnight star on social media होऊ शकतात. हा व्हिडीओ देखील असाच काहीसा आहे. कारण या व्हिडिओमध्ये एक काकू एका लग्नात तुफान डान्स करताना पाहायला मिळतायत. हा एक लग्नाचा व्हिडीओ असल्याचं समजतं. यामध्ये आसपास आणखी काही माणसे पाहायला मिळतायत. 

तसे सोशल मीडियावर लग्नांचे अनेक व्हिडीओ पडत असतात. यातील बऱ्यापैकी गावाकडचे किंवा रस्त्यावर कुणी बेफाम होऊन डान्स करत असेल तर असे व्हिडीओ व्हायरल होतात. मात्र हा व्हिडीओ एका बंदिस्त हॉलमधील असल्याचं पाहायला मिळतं, हा एक हायफाय लग्नातील व्हिडीओ असल्याचं समजतंय( Wedding Dance Video) . पण या लग्नातील व्हिडिओमधील काकूंनी जो डान्स केला ( Aunty In red saree) आहे, तो भन्नाट आहे म्हणूनच हा प्रचंड व्हायरल ( Viral Video)  झाला आहे.  

लग्न म्हंटल की धम्माल आणि मस्ती असते ( Wedding Dhamal ) . अशीच धम्माल या लग्नात या काकूंनी केलेली पाहायला मिळतेय. या काकू डान्स करण्याचा पुरेपूर आनंद घेताना पाहायला मिळतायत. इंस्टाग्राम अकाउंट 69fix वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 69Flix (@69.flix)

या व्हिडिओत बँग बँग  ( Bang Bang Song ) हे गाणं वाजताना पाहायला मिळतंय. काह मंडळींनी या काकूंना घेरलं आहे. यानंतर या काकू एक एक स्टेप्स करायला सुरुवात होते. एका क्षणाला काकू जमिनीवर बसून डान्स स्टेप्स करतात. यावर उपस्थितांच्या एकच टाळ्या वाजतात. लाल साडीतील या काकूंनी संपूर्ण माहोल बदलून टाकला असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. 

bhabhi in red saree dance on bang bang song video goes viral on social media