असं करा म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जातून मुक्त व्हाल; जाणून घा काय आहेत उपाय?

जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकला असाल तर काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला या समस्येतून बाहेर निघण्याचे काही मार्ग दाखवणार आहोत.

Updated: Aug 13, 2022, 06:46 PM IST
असं करा म्हणजे तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जातून मुक्त व्हाल; जाणून घा काय आहेत उपाय? title=

Credit Card Debt repayments :  शॉपिंग आणि क्रेडिटकार्ड हे एक प्रसिद्ध समिकरण तयार झालं आहे. सणांच्या मुहूर्तावर जवळ जवळ प्रत्येक बँक क्रेडिट कार्डची जास्तीत जास्त विक्री करण्याचा प्रयत्न करते. यासाठी बँक विविध प्रकारच्या मार्केटिंग ट्रिक्सचा वापर करुन ग्राहकांना खास आकर्षित ऑफर्स दिल्या जातात. अनेकजन या ऑफर्सला आकर्षित होऊन क्रेडिट कार्ड घेतात. शॉपिंग करताना क्रेडिटकार्ड ओव्हरस्पेंडिंग करतात. त्यानंतर क्रेडिट कार्डच्या रिपेमेंटसाठीच्या अडचणींना सामोरं जावं लागतं. असे अनेक ग्राहक आहेत ज्यांना या समस्येपासून सुटका हवी आहे. जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकला असाल तर काळजी करु नका. आज आम्ही तुम्हाला या समस्येतून बाहेर निघण्याचे काही मार्ग दाखवणार आहोत.

अशी बनवा रिपेमेंट स्ट्रॅटेजी

तुम्हाला जर क्रेडिट कार्डच्या कर्जापासून सुटका पाहिजे असेल तर त्यासाठी रिपेमेंट गोल आणि त्याची एक स्ट्रॅटेजी बनवावी लागेल. यामध्ये चार गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. 

- सर्वात प्रथम म्हणजे, जर तुमची सेविंग जास्त होत असेल तर मिनिमम अमाउंट ड्यू भरा. यामुळे तुमचं व्याज कमी होईल. 
- दुसरं म्हणजे, डेट स्कोबॉल, याचाच अर्थ की तुम्ही लहान -लहान कर्ज फेडा. यानंतर, मोठे कर्जफेडकरण्यासाठी पुरेशी रक्कम तुमच्याकडे तयार होईल.
- रिपेमेंटची तिसरी स्ट्रॅटेजी ही आहे की, तुम्ही तुमच्या क्रेडिट लिमिटला पर्सनल लोनमध्ये कंव्हर्ट करा आणि सोईस्कर इंस्टॉलमेंटमध्ये पेमेंट करा. साधारणत: पर्सनल लोनचे व्याजदर क्रेडिट कार्डची थकबाकी व्याज दरापेक्षा कमी होते. 
- चौथा म्हणजे, तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट विसरु नका. यासाठी ऑटोमॅटिक पेमेंट सेट करा. प्रत्येक बँकेत ही सेवा दिली जाते. यामुळे लेट पेमेंट करण्याची गरज पडणार नाही.

कर्जाला एकाच अकाउंटमध्ये घ्या

जर क्रेडिट कार्डच्या एकापेक्षा जास्त थकबाकी असतील तर डेट कंसॉलिडेशन करणे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. म्हणजेच, क्रेडिट कार्ड पेमेंट्सला एका अकाउंटमध्ये समावेश करु शकता. यामुळे ,तुम्हाला वेगवेगळे पेमेंट करण्याची गरज पडणार नाही आणि एकच पेमेंट करावं लागेल. 

बँकेशी किंवा कंपनीशी संपर्क करा

क्रेडिट कार्ड डेटमधून बाहेर निघण्याचा सर्वात सोप्पा मार्ग म्हणजे तुम्ही अ‍ॅक्टिव्ह अ‍ॅप्रोच ठेवावा.  सर्वात पहिले तुम्ही क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँके किंवा कंपनीशी संपर्क करुन विचारा की तुम्हाला रिपेमेंटच्या नियमांमध्ये किती आणि काय सुट मिळू शकते. जर तुमची थकबाकी जास्तच असेल तर बँक तुम्हाला मार्गदर्शन करेल.

खर्चामध्ये काटकसर करा

क्रेडिट कार्डचं कर्ज जर तुम्हाला त्रासदायक ठरत असेल तर अशावेळी तुम्ही तुमच्या खर्चामध्ये कपात करायला हवी. तुमचा पगार झाला की क्रेडिट कार्डची थकबाकी दुर करण्यासाठी प्रयत्न करा. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या पैशांमध्ये महिन्याचा बजेट बनवा. खर्च करण्याआधी थकबाकी दुर करण्याची स्ट्रॅटेजी खुप प्रभावी आहे. यामुळे तुमचा क्रेडिट स्कोर देखील चांगला होईल.