Investment Tips : तुम्ही गुंतवणूकीचा विचार करताय? 'या' टिप्स तुम्हाला बनवतील मालामाल...

आज आम्ही तुम्हाला गुंतवणूकीसंदर्भात Top 7 Tips सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मालामाल व्हाल.

Updated: Aug 18, 2022, 03:28 PM IST
Investment Tips : तुम्ही गुंतवणूकीचा विचार करताय? 'या' टिप्स तुम्हाला बनवतील मालामाल... title=

Top 7 Investment Tips : गुंतवणूक करण्याची इच्छा आहे पण नेमकी कशामध्ये गुंतवणूक करावी? केलेल्या गुंतवणूकीमुळे नुकसान झालं तर? गुंतवणूक करण्याची भीती वाटते? गुंतवणूकीची सुरुवात कशी करावी? तुमच्या मनात असेच काहीसे प्रश्न पडले आहेत का? कारण, सर्वसाधारणपणे गुंतवणूक करताना असे प्रश्न मनात घर करतात. पण आज आम्ही तुम्हाला गुंतवणूकीसंदर्भात Top 7 Tips सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही मालामाल व्हाल.

उत्तम गुंतवणूकीसाठी टॉप 7 टिप्स :-

1. एक योजना बनवा

इंग्रजी भाषेतलं एक सुंदर वाक्य आहे ते म्हणजे 'If you fail to plan, plan to fail'. तुम्हाल गुंतवणूक करताना एक उत्तम योजना बनवावी लागणार आहे. ही योजना बनवताना, तुम्ही किती रुपयांची गुंतवणूक करु शकता? किती रुपयांचा तोटा सहन करण्याची तुमची तयारी आहे? गुंतवणूक करताना तुमचं ध्येय काय आहे? यांसारख्या अनेक प्रश्नांना विचारात घेऊन तुम्ही योजना बनवायला हवी.

2. तुमची जोखीम घेण्याची क्षमता ओळखा

गुंतवणूक करताना नफ्यासोबत जोखीमसुद्धा येतेच. तुम्ही गुंतवणूक करताना सुरुवातीला जास्त रकमेची गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करू नये. जोखीम आणि नफा मिळण्याची रक्कम यांचा समतोल साधूनच गुंतवणूक करा.

3. वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये गुंतवणूक करा

गुंतवणूक करताना हे कायम लक्षात असूद्या, की तुमची रक्कम ही एकाच ठिकाणी गुंतवणं तुम्हाला कधी कधी तोट्याचं ठरु शकतं. जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केलेली असेल आणि तुम्हाला तोटा झाला तर एकाच गुंतवणूकीतून तोटा सहन करावा लागू शकतो आणि इतर ठिकाणी केलेल्या गुंतवणूकीतून नफा हा मिळू शकतो.

4. लंगड्या घोड्यावर पैसा लावू नका

भविष्याचा विचार करुन तुम्ही गुंतवणूक करायला हवी. उदा. दिवाळी सण येण्याआधीच डाळीमध्ये गुंतवणूक करा म्हणजे तुम्हाला ती कमी किंमतीमध्ये मिळेल आणि दिवाळीच्या वेळी डाळीची विक्री करा म्हणजे तुम्हाल जास्त नफा मिळेल. असा भविष्याचा विचार करुन गुंतवणूक करा.

5. सातत्याने गुंतवणूक करत रहा

कमी-जास्त प्रमाणात सतत गुंतवणूक करायला हवी. म्हणजेच, तुमची असलेली गुंतवणूक ही थोडी थोडी करत मोठ्या रक्कमेची गुंतवणूक होऊ शकेल.

6. मिळालेला नफा पुन्हा गुंतवणूकीसाठी वापरा

गुंतवणूकीतून मिळालेला नफा तुम्ही पुन्हा गुंतवणूकीसाठी वापरायला हवा. यामुळे रक्कम वाढेल आणि याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल.

7. विश्लेषण करा

तुम्ही केलेल्या गुंतवणूकीतून झालेला नफा आणि तोटा यांच विश्लेषण करा. यामुळे तुम्हाला भविष्यात नेमकी काय रणनिती तयार करायला हवी? याचा अंदाज येईल.