Income Tax Return भरण्यापूर्वी जाणून घ्या फॉर्म 16 मधील 'या' खास गोष्टी

आयकर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  31 जुलै 2022 पर्यंत 2021-22 वर्षासाठी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे.

Updated: Jun 28, 2022, 02:06 PM IST
Income Tax Return भरण्यापूर्वी जाणून घ्या फॉर्म 16 मधील 'या' खास गोष्टी title=

Income Tax Return: आयकर भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.  31 जुलै 2022 पर्यंत 2021-22 वर्षासाठी आयटीआर दाखल करणे आवश्यक आहे. दुसरीकडे, जर तुम्ही या तारखेनंतर आयटीआर दाखल केला तर दंडही लागू होऊ शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न भरताना फॉर्म 16 हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. लोकांना याबाबत फारच कमी माहिती आहे. इनकम टॅक्स भरताना फॉर्म 16 हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. फॉर्म 16 तुमच्या कंपनीच्या वतीने जारी केला जातो. या फॉर्म 16 मध्ये, घेतलेले पगार, कपात, कर कपात, भत्ता याशिवाय इतर माहिती असते. ही माहिती आयकर रिटर्न भरत असताना उपयोगी पडतात.

या फॉर्मच्या मदतीने तुम्ही तुमचा आयकर संबंधित डेटा जुळवून घेऊ शकता. यामुळे आयटीआर भरण्यात कोणतीही चूक होणार नाही. मात्र, फॉर्म 16 मधील आकडे आणि इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये भरायचा डेटा वेगळा असेल आणि याची काळजी घेतली पाहीजे. अन्यथा भविष्यात मोठा त्रास होऊ शकतो. तर फॉर्म 16 मध्ये दोन भाग आहेत. एक 'Part A' आणि दुसरा 'Part B'.

'Part A' मधील माहिती

  • कर्मचाऱ्याचं नाव आणि पत्ता
  • नियोक्त्याचे नाव आणि पत्ता
  • तुमच्या नियोक्त्याचा पॅन क्रमांक आणि TAN क्रमांक 
  • कर्मचाऱ्याचा पॅन तपशील
  • मूल्यांकन वर्ष
  • टीडीएस कपातीचा सारांश
  • नोकरीच्या कालावधीचा तपशील

'Part B' मधील माहिती

  • पगारावर आकारणीयोग्य उत्पन्न
  • एकूण उत्पन्न (पगार) + इतर उत्पन्न
  • कलम 80C/80CCC/80CCD अंतर्गत वजावट (कमाल मर्यादा रु. 1.5 लाख)
  • 80D (आरोग्य विमा प्रीमियम), 80E (शिक्षण कर्जावरील व्याज), 80G (देणगी) आणि इतर यांसारख्या इतर विभागांतर्गत वजावट प्रदान केली जाते.
  • पात्र कपातीची बेरीज