लागोपाठ ४ दिवस बँका बंद, कामं लवकर उरकून घ्या

मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ ४ दिवस बँका बंद असणार आहेत.

Shreyas deshpande Updated: Mar 17, 2018, 05:34 PM IST
लागोपाठ ४ दिवस बँका बंद, कामं लवकर उरकून घ्या title=

मुंबई : मार्च महिन्याच्या शेवटी लागोपाठ ४ दिवस बँका बंद असणार आहेत. २९ मार्च ते १ एप्रिलपर्यंत बँकांमध्ये कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत, त्यामुळे बँकांमधली तुमची कामं लवकर उरकून घ्या. २९ मार्चपासून चेक क्लिअरन्स आणि ड्राफ्टही बनणार नाहीत.

२९ मार्चला महावीर जयंती, ३० मार्चला गुड फ्रायडे, ३१ मार्चला बँकांची क्लोजिंग डेट तसंच १ एप्रिलला रविवार आहे. त्यामुळे या चारही दिवशी बँकेचे व्यवहार होणार नाहीत. ४ दिवस बँका बंद असल्यामुळे जीएसटी, वीम्याचे हफ्ते आणि आयकर जमा करण्याची शेवटची तारीख २७ मार्च करण्यात आली आहे. या ४ दिवसांमध्ये सरकारी कार्यालयही बंद असल्यामुळे या कार्यालयांना आर्थिक वर्षाचे शेवटचे व्यवहार २८ मार्चपर्यंत पूर्ण करावे लागणार आहेत.