Bank Q4 Result : या दोन सरकारी बँकांनी कमावला विक्रमी नफा, गुंतवणूकदारांना मोठा फायदा

Union Bank of India Share Price : सार्वजनिक क्षेत्रातील दोन मोठ्या बँकांनी चांगला नफा कमावला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना याचा मोफा फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये, बँक ऑफ इंडियाचा नफा वाढून 3,882 कोटी रुपये झाला. तर युनियन बँक ऑफ इंडियालाही नफा झाला आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: May 7, 2023, 02:06 PM IST
Bank Q4 Result : या दोन सरकारी बँकांनी कमावला विक्रमी नफा, गुंतवणूकदारांना मोठा फायदा  title=

Bank of India Share Price : दोन सरकारी बँकांनी गेल्या आर्थिक वर्षात चांगली कमाई केली आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील या बँकांना झालेला नफा ही त्यांच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. गुंतवणूकदारांना याचा मोठा फायदा होणार आहे. बँक ऑफ इंडियाचा आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये  नफा वाढून 3,882 कोटी रुपये झाला आहे. तसेच  युनियन बँक ऑफ इंडियालाही नफा झाला आहे. बँक ऑफ इंडियाचा 2021-22 या आर्थिक वर्षात नफा 3,406 कोटी रुपये होता. बँक 2023-24 मध्ये भागभांडवल म्हणून 4,500 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे.  2021-22 या आर्थिक वर्षात ते 3,406 कोटी रुपये होते. बँक 2023-24 मध्ये भागभांडवल म्हणून 4,500 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. या निर्णयामुळे बँकेतील सरकारची हिस्सेदारी 75 टक्क्यांवर पोहोचण्यास मदत होणार आहे.

व्याज उत्पन्नात 37 टक्के वाढ

गेल्या आर्थिक वर्षात बँक ऑफ इंडियाचे मूळ निव्वळ व्याज उत्पन्न 37 टक्क्यांनी वाढून 5493 कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत अॅडव्हान्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निव्वळ व्याज मार्जिन वार्षिक आधारावर 2.56 टक्क्यांवरgन 3.15 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. बँकेचे बिगर व्याज उत्पन्न मार्च तिमाहीत वार्षिक 1,587 कोटी रुपयांवरgन 3,099 कोटी रुपये झाले आहे. सोमवारी बँकेच्या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी बंद झालेल्या ट्रेडिंग सत्रात शेअर 86.50 रुपयांवर बंद झाला होता.

81 टक्क्यांनी युनियन बँकेचा नफा वाढला 

बँक ऑफ इंडियाने चांगली कामगिरी केली असताना दुसरी सरकारी बँक युनियन बँक ऑफ इंडियाचा (UBI) गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत निव्वळ नफा 80.57 टक्क्यांनी वाढून 2,811 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राईट ऑफ लोनमधून वसुलीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा नफा वाढल्याचे बँकेने म्हटले आहे.  आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये वार्षिक आधारावर निव्वळ नफा 5,265 कोटी रुपयांवरुन 8,512 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे.

दरम्यान, मार्च तिमाहीत युनियन बँक ऑफ इंडियाचा निव्वळ नफा 21.88 टक्क्यांनी वाढून   8,251 कोटी रुपये झाला आहे. या कालावधीत, अ‍ॅडव्हान्स 13 टक्क्यांनी वाढले आणि निव्वळ व्याज मार्जिन 2.75 टक्क्यांवरुन 2.98 टक्क्यांपर्यंत वाढले. मार्च तिमाहीत गैर-व्याज उत्पन्न 62.48 टक्क्यांनी वाढून 5,269 कोटी रुपये झाले.  राइट-ऑफ खात्यांमधून वसुली वार्षिक आधारावर 294 कोटी रुपयांवरुन 2,954 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. याचा फायदा शेअर घेणाऱ्यांना झाला आहे.

 

(Disclaimer: कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ZEE 24 TAAS तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही.)