Bank News : फायदा की तोटा? तुम्हीच ठरवा; क्रेडिट कार्ड वापराचे नियम बदलले

Bank News : बँकेकडून ग्राहकांसाठी अनेक सुविधा दिल्या जातात. अशा सुविधांचा लाभ घेणाऱ्याची संख्या अधिक असून त्यामध्ये क्रेडिट कार्ड धारकांचा आकडा मोठा आहे.   

सायली पाटील | Updated: Mar 25, 2024, 01:11 PM IST
Bank News : फायदा की तोटा? तुम्हीच ठरवा; क्रेडिट कार्ड वापराचे नियम बदलले title=
Bank News Credit card rules change know benefits

Bank News : बँका आणि तत्सम आर्थिक संस्थांचा मनमानी कारभार थांबवत ठेवीदार आणि ग्राहकांचा फायदा केंद्रस्थानी ठेवत आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक काही महत्त्वांचे नियम आखत असते. मागच्या कैक दिवसांपासून आरबीआयनं अशा संस्थांना इंगा दाखवत अनेकांचे परवानेही रद्द केले आहेत. ज्यानंतर आता देशातील सर्वोच्च बँकेनं क्रेडिट कार्ड वापरासंबंधीचे नियम बदलले आहेत. आरबीयच्या एका निर्णयामुळं ग्राहकांना सर्वतोपरी अधिकार मिळत असून ते या माध्यमातून स्वत:च्या प्राधान्यानुसार क्रेडिट कार्डचा पर्याय निवडू शकणार आहेत. 

इथून पुढं बदललेल्या नियमांनुसार क्रेडिट कार्ड वापरताना बिलिंग सायकलसंदर्भातही काही नियम लागू केले आहेत. ज्यामुळं आता ग्राहकांना त्यांच्या मर्जीनं आणि आर्थिक मर्यादेनुसार क्रेडिट कार्डचा वापर करता येणार आहे. 

इतकंच नव्हे, तर ग्राहकांना क्रेडिट कार्डचा थेट लाभ घेता येणार असून, एकाच वेळी अनेक कार्ड निवडण्याचा पर्याय निवडता येणार आहे. व्हिसा, मास्टरकार्ड या किंवा अशा कोणत्याही नेटवर्क आणि कंपनीचं कार्ड कंपनी निवडू शकणार आहे. 

क्रेडिट कार्ड जारी करत असताना बँकेकडून ग्राहकांना कार्ड नेटवर्कसंबंधीचा प्रश्न विचारण्यात येईल. तर, जुने कार्ड असणाऱ्यांना कार्डधारकांनाही कार्डचा पर्याय निवडण्याची मुभा असेल. 10 लाखांहून कमी सक्रिय असणाऱ्या कार्ड धारकांसाठी क्रेडिट कार्डचा हा नवा नियम लागू नसेल. 

हेसुद्धा वाचा : Video : 'भाजप खतरनाक! मी शिंदेंना आधीच सांगितलेलं...' गप्पांच्या ओघात नाना पटोलेंकडून राजकीय गुपितं उघड

 

क्रेडिट कार्डसंबंधीच्या या नियमाचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी काही अटींची पूर्तता करणं अपेक्षित असेल. यासाठी तुम्ही जुनी देय रक्कम पूर्णपणे फेडणं अपेक्षित असेल. बिलिंग पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड कंपनीला एक request करावी लागणार आहे. अन्यथा तुम्ही मोबाईल अॅपच्या माध्यमातूनही यासाठीची request करावी लागणार आहे.