सर्वोच्च न्यायालयाची दिल्लीत फटाके विक्रीवर बंदी

सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. 

Updated: Oct 9, 2017, 01:37 PM IST

नवी दिल्ली : यंदा राजधानी दिल्लीतल्या आसमंतात दिवाळीत प्रदूषण होणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात फटाके विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. 

राष्ट्रीय राजधानी परिसरात 50 लाख क्विंटल फटाके विक्री होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होईल अशी भीती व्यक्त करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. 

त्यावर आज न्यायालयानं निकाल दिला.  दिल्लीतल्या वायूप्रदुषणाचा मुद्दा अत्यंत गंभीर झाला आहे. त्यातच दिल्लीतल्या वातावरणात प्रदुषणामुळे हवेचा दर्जाही घसरला आहे. 

येत्या काळात धुकंही वाढत जाणार आहे. धुर आणि धुक यांचा एकत्रित परिणाम दिल्लीतल्या नागरिकांच्या आरोग्यावर आणखी वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे.