Online Price Of Baburao Short: ऑनलाईनच्या युगात एका क्लिकवर वस्तू ऑर्डर करणं शक्य आहे. यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाऊन ठराविक भाव करण्याची गरज भासत नाही. सर्व वस्तूंच्या किंमती त्या त्या वस्तूसोबत दिलेल्या असतात. तसं पाहिलं तर दुकानाच्या तुलनेत ऑनलाईन शॉपिंगमध्ये ब्रँडेड वस्तू स्वस्तात मिळतात, असा काही जणांचा अनुभव आहे. तर काही वेळा ग्राहकांच्या पदरी निराशा देखील पडते. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून सर्वात जास्त खरेदी ही कपड्यांची होते. त्यात आरामदायी कपड्यांना सर्वाधिक पसंती दिले जाते. पण साध्या पट्ट्यापट्ट्यांच्या चड्डीची किंमत पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. हेराफेरी चित्रपटातील बाबुराव या पात्रानं घातलेल्या चड्डीची किंमत तुमच्या खिशाला परवडणारी नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या चड्डीची किंमत 15 हजार रुपये आहे. किंमत वाचून बसला ना धक्का...
जर आपण लोकल मार्केटमध्ये जाऊन बाबुराव स्टाईलची चड्डी विकत घेतली, तर कमीत कमी 200 रुपयांना पडेल. त्याचबरोबर चांगल्या ब्रँडची चड्डी घेतली तर जास्तीत जास्त 1000 रुपयांना मिळेल. पण ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या चड्डीची किंमत चक्क 15 हजार रुपये इतकी आहे. दुसरीकडे रिबॉक, प्यूमा आणि एडिडाससारखे ब्रँडच्या शॉर्ट्स 1,500 रुपयांपासून मिळतात. त्यामुळे या चड्डीत असं काय आहे की 15 हजार रुपये किंमत ठेवली आहे, असा प्रश्न नेटकरी व्यक्त करत आहेत. ट्विटरवर @vettichennaiguy नावाच्या अकाउंटवरून ही पोस्ट शेअर केलं असून प्रतिक्रिया नोंदवत आहेत.
why is this pattapatti trouser 15k? pic.twitter.com/RrBSeFqd3I
— Arshad Wahid (@vettichennaiguy) July 30, 2022
नेटकऱ्यांनी या चड्डीच्या किमतीवरून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, "या वेबसाईटवरून कोण लोकं आहेत जे 15 हजार रुपयांना चड्डी विकत घेत आहेत." दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "जबरदस्त डिझाईन असलेली चड्डी आहे, फक्त हृदयविकाराच्या त्रास असल्याने किंमत पाहू नका." तिसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, "बाबुरावनेही इतकी महाग चड्डी घातली नसेल."