राम केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचेही पूर्वज होते- बाबा रामदेव

राम मंदीर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापणार आहे.

Updated: Feb 9, 2019, 11:18 AM IST
राम केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचेही पूर्वज होते- बाबा रामदेव  title=

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदीर प्रकरणावरुन सध्या देशातील राजकारण रंगताना दिसत आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत राम मंदीर बांधणार या मुद्द्यावर भाजपाने निवडणूक लढली तर आता राम मंदीर बांधले नाही यामुद्द्यावर विरोधक 2019 च्या निवडणूकीची तयारी करत आहेत. त्यामुळे राम मंदीर प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापणार आहे. या पार्श्वभूमीवर योग गुरू बाबा रामदेव यांनी एक विधान केले आहे.  राम हे केवळ हिंदूंचेच नव्हे तर मुस्लिमांचेही पूर्वज होते असे त्यांनी म्हटले आहे. अहमदाबाद पासून 70 कि.मी दूर असलेल्या खेडा जिल्ह्यातील नडियाद शहरात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. संतराम मंदिराद्वारे आयोजीत एका योग शिबीरात सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. राम मंदिर हा मुद्दा मतांच्या राजकारणाशी जोडला गेला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

Image result for ramdev zee news

एका प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, माझे दृढ मत आहे की अयोध्येत राम मंदीराचे निर्माण व्हायला हवे. जर अयोध्येत राम मंदीर नाही झाले तर कुठे बनवणार ? मक्का, मदीना किंवा वेटिकन शहरात तर हे मंदीर होणार नाही. अयोध्या हीच रामाची जन्मभूमी आहे हे निर्विवाद आहे. प्रभु राम हे केवळ हिंदुचेच नव्हे तर मुस्लिमांचेही पुर्वज होते असेही बाबा रामदेव यांनी सांगितले. राम मंदिराचा हा मुद्दा देशाच्या गौरवाशी जोडला गेला आहे. याचा मताच्या राजकारणांशी काही संबंध नाही. 

कॉंग्रेसकडून बाबा रामदेव यांच्यावर सडकून टीका करण्यात आली आहे. बाबा रामदेव यांच्या सारखा धार्मिक नेता सत्ताधारी भाजपाचा लाभार्थी आहे. ते भाजपा निवडणूकीत जिंकण्यासासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत असतात. भाजपा आणि मोदी सरकारला मदत करण्यासाठी बाबा रामदेव पुन्हा समोर आले कारण पुढच्या पाच वर्षात त्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावा असा टोला कॉंग्रेसतर्फे लगावण्यात आला.