नवी दिल्ली : ट्रिपल तलाकवर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे जवळपास सर्व राजकीय पक्षांनी स्वागत केले आहे. पण असे काही नेते आहेत की त्यांना हे धार्मिक गोष्टीत कोर्टाची दखल असल्याचे वाटते आहे.
यूपी सरकारमधील माजी मंत्री राहिलेले मोहम्मद आझम खान यांनी देशातील ९ कोटी मुस्लिम महिलांच्या हितासाठी दिलेल्या या महत्त्वपूर्ण निकालावर म्हटले की सर्वांनी कोर्टाचा सन्मान केला पाहिजे, पण आझम खान यांनी सुप्रीम कोर्टानंतरही जनतेचे न्यायालय हे लोकशाही राष्ट्रात असते. जर भारतात लोकशाहीचा थोडाही भाग बाकी असेल तर त्यांनी धार्मिक भावनांशी खेळले नाही पाहिजे. नाही खूप अवघड होऊन जाईल. मग कोणाच्याही आस्थेवर कधी घाला घातला जाईल हे सांगता येणार नाही.
आझम खान म्हटले की संसदेने या विषयावर कायदा केला तर त्याला इस्लामिक स्कॉलर्सचे मत विचारात घेतले जाईल आणि त्यांचा निर्णय असेल . इस्लामिक स्कॉलर्स कोणत्याही धर्माच्या राजकारणाशी प्रेरीत नसतात. आम्हांला आशा आहे की संसदेत जो पण कायदा होईल तो मुसलमानांचा धर्म, त्यांची आस्था आणि उलेमा, इस्लामिक स्कॉलर्स त्यांच्या सल्ल्याने होईल.