कोरोनावर औषध शौधल्याचा दावा, आयुर्वेदीक डॉक्टरला सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला दंड

 याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दंड ठोठावलाय.

Updated: Aug 21, 2020, 05:08 PM IST
कोरोनावर औषध शौधल्याचा दावा, आयुर्वेदीक डॉक्टरला सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला दंड title=

नवी दिल्ली : मार्चपासून सुरु झालेलं कोरोना संकट अद्यापही गेलेलं नाहीय. यावर औषध शोधल्याचा दावा देशासह जगभरातील अनेक औषध कंपन्यांनी केला. पण यातील अनेकांना मान्यता मिळाली नाही. दरम्यान एका आयुर्वेदीक डॉक्टरला याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दंड ठोठावलाय.  ओमप्रकाश वैद्य ग्यांताराने सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. 

कोरोनावर औषध शोधल्याचा दावा यामध्ये त्याने केला होता. या औषधाचा उपयोग देशभरातील सर्व डॉक्टर्स आणि रुग्णालयांनी करावा अशी मागणी यात केली होती. 

आयुर्वेदीत औषध आणि शल्यचिकित्सेत डिग्री असलेल्या डॉक्टर ग्यांतरा याने न्यायालयात मागणी केली होती. कोर्टाने भारत सरकारचे सचिव आणि आरोग्य विभागाला कोरोनावर औषधाचा वापर करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी केली. पण सर्वोच्च न्यायालयाने यावर नाराजी व्यक्त केली. 

ज्ञानताराची मागणी पूर्णपणे चुकीची आहे. आणि अशाप्रकारची निष्फळ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करु नये हा संदेश जनतेत जाणं गरजेचं असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. 

कोरोना आल्यापासून जगभरात यावर संशोधन सुरु आहे. पण केवळ रशियालाच यामध्ये यश मिळालं आहे. जगातील पहीलं कोरोना वॅक्सिन शोधल्याचा दावा रशियाने केलाय. जगभरातील लोकांना विश्वास बसण्यासाठी ही लस पंतप्रधानांनी स्वत:च्या मुलीला दिली. या लसीवर संपूर्ण जगभरात संशोधन सुरु आहे.