Ayodhya Killing: अयोध्येतही एका व्यक्तीची गळा चिरून हत्या; हनुमान चबुतऱ्यावर खळबळजनक घटना

Ayodhya Murder Case: उत्तर प्रदेशातील अयोध्येतून धक्कादायक घटना समोर आली आहे. अयोध्येतील पंकज नावाच्या व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

Updated: Jul 4, 2022, 07:49 AM IST
Ayodhya Killing: अयोध्येतही एका व्यक्तीची गळा चिरून हत्या; हनुमान चबुतऱ्यावर खळबळजनक घटना title=

 अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येतून धक्कादायक घटना समोर आली असून पंकज नावाच्या व्यक्तीची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. ही घटना समोर येताच अयोध्येत एकच खळबळ उडाली आहे. ही घटना हनुमान चुबतऱ्याजवळ घडली आहे. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे वय 35 वर्षे इतके होते. हत्या झाली तेव्हा पंकज हनुमान मंदिराच्या चबुतऱ्यावर झोपला होता. अयोध्या पोलिसांनी याप्रकरणी कसून चौकशी सुरू केली आहे.

हनुमान मंदिर चबुतऱ्यावर झोपलेल्या पंकजची हत्या
अयोध्येतील व्यक्तीची गळा चिरून हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. 
पंकज गेल्या 2 महिन्यांपासून आपल्या मामाच्या घरी राहत होता. आणि रात्री जेवण केल्यानंतर वीज नसल्याने तो घराबाहेर हनुमान मंदिराजवळील कबुरतऱ्यावर झोपला. सकाळी परिवारातील लोकांना त्याठिकाणी त्याचा मृतदेहच आढळून आला. पोलीस या घटनेची कसून चौकशी करीत आहेत.

प्रशासकीय अधिकारी सत्येंद्र भूषण तिवारी यांनी म्हटले की, भाऊपूर गावात गळा चिरलेला मृतदेह आढळून आला आहे. पीडित अमेठी जिल्ह्यातील राहणारा आहे. तो बऱ्याचदा मंदिराच्या चबुतऱ्यावर झोपण्यास जात असे. मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. 

उदयपूर आणि अमरावतीमध्येही अशाच हत्या 

पंकजचा शिरच्छेद करून त्याची हत्या का करण्यात आली हे अद्याप समजू शकलेले नसले तरी, राजस्थानमधील उदयपूरमध्ये (Udaipur Murder Case) 28 जून रोजी कन्हैया लाल या शिंपीची हत्या करण्यात आली होती. याशिवाय 21 जून रोजी महाराष्ट्रातील अमरावती (Murdered Amravati ) येथे उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली आहे. कन्हैया लाल आणि उमेश कोल्हे या दोघांनी नुपूर शर्माला पाठिंबा दिला म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.