नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याची सुनावणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पार पडली. आजच्या सुनावणीत न्यायालय खटल्याच्या पुढील तारखा निश्चित करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, न्यायालयाने ही सुनावणी थेट जानेवारी महिन्यापर्यंत पुढे ढकलली आहे. त्याचवेळी खटल्याच्या पुढील तारखा निश्चित करण्यात येतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस.के. कौल आणि के.एम. जोसेफ यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या खटल्याचा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. भाजपकडून हा निकाल लवकर लागावा, यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. वेळ पडल्यास राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने कायदा करावा, असे मत अनेक भाजपच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केले आहे.
Supreme Court adjourns the matter till January 2019 to fix the date of hearing in #Ayodhya title suit https://t.co/wZxixh9RVz
— ANI (@ANI) October 29, 2018