कचा बदाम गाण्यावर महिलेनं धरला ठेका, पाहून भल्याभल्यांच्या हृदयाचा चूकला ठोका, पाहा व्हिडीओ

लग्न असो किंवा अनेक फंक्शन्स, लोक कचा बदाम गाण्यावर डान्स करायला लोक विसरत नाहीत.

Updated: Apr 20, 2022, 10:03 PM IST
कचा बदाम गाण्यावर महिलेनं धरला ठेका, पाहून भल्याभल्यांच्या हृदयाचा चूकला ठोका, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जे आपलं मनोरंजन करतात. सध्या सोशल मीडियावर रिल्सचा ट्रेन्ड सुरु आहे. जेथे लोक फेमस किंवा ट्रेऩ्डींग कन्टेन्ट वरती व्हिडीओ बनवतात. ज्यातील काही व्हिडीओ हे असे काही व्हायरल होतात की, रातोरात ते प्रसिद्धीच्या झोतात येतात. सध्या एका महिलेचा डान्स सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

सुरुवातीच्या काही काळात कचा बदाम गाण्याने लोकांना वेड लावलं होतं. जो-तो आपल्याला या गाण्याचा ठेका धरताना पाहायला मिळला आहे. तसेच अजूनही लोकं या गाण्यावर नाचण्याचा आपला मोह आवरु शकत नाहीय, मग ही महिला तरी कशी आवरु शकेल?

लग्न असो किंवा अनेक फंक्शन्स, लोक कचा बदाम गाण्यावर डान्स करायला लोक विसरत नाहीत. या प्रोग्राममध्ये देखील हे गाणं लागलं होतं. तेव्हा या महिलेनं या गाण्यावर आपला ठेका धरला आणि तो असा काही धरला की, बस्स...

ही महिला सगळं काही विसरुन कचा बदाम गाण्यावर नाचू लागली, तिची ही शैली लोकांना फार आवडली, कचा बदाम गाण्यावर ही आंटी वेगवेगळ्या प्रकारच्या डान्स मूव्हज करत आहेत, तसेच तिचे एक्सप्रेशन्सही अप्रतिम आहेत. ज्यामुळे तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हिडीओमध्ये आंटी ज्या पद्धतीने डान्स करत आहे, तो डान्स सहसा कुठेही दिसत नाही. butterfly__mahi नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे.

या व्हिडीओवर नेटिझन्सकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. या डान्स व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.